तालिबानवर हवाई हल्ले
By Admin | Published: December 25, 2015 12:28 AM2015-12-25T00:28:19+5:302015-12-25T00:28:19+5:30
तालिबान्यांचा पराभव व अफगाण सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी अमेरिकन सैन्याने काबूल परिसरातील हवाई हल्ले गुरुवारी वाढवले आहेत.
काबूल : तालिबान्यांचा पराभव व अफगाण सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी अमेरिकन सैन्याने काबूल परिसरातील हवाई हल्ले गुरुवारी वाढवले आहेत. अफूने समृद्ध असलेला हा अस्थिर प्रदेश तालिबान्यांच्या ताब्यात जात असून त्या भागात प्रथमच ब्रिटिश सैन्यालाही पाचारण करण्यात आले आहे.
तालिबानी सैन्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी संपूर्ण संगीन जिल्ह्यावर ताबा मिळवला असून दक्षिण हेल्मंड प्रांतावर पकड मिळविली आहे. त्या भागातील रहिवासी परागंदा होत असून तालिबानी सैन्याच्या ताब्यात आलेल्यांचे ते शिरकाण करीत आहेत. जवळपास संपूर्ण प्रांत त्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाटो प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकन सैन्याने संगीनवर दोनदा हवाई हल्ले केले. तालिबानी प्रवक्ता म्हणाला की, संगीनवर आम्ही ताबा मिळवला आहे. (वृत्तसंस्था)