बॉम्बच्या भितीमुळे एअर फ्रान्सचे विमान केनियामध्ये उतरवले

By admin | Published: December 20, 2015 03:12 PM2015-12-20T15:12:18+5:302015-12-20T15:12:18+5:30

मॉरिशेसहून पॅरिसला जाणा-या एअर फ्रान्सच्या विमानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रविवारी केनियाच्या मोमबासा विमानतळावर विमानाचे इर्मजन्सी लँण्डीग करण्यात आले.

Air France flight took off in Kenya due to the fear of the bomb | बॉम्बच्या भितीमुळे एअर फ्रान्सचे विमान केनियामध्ये उतरवले

बॉम्बच्या भितीमुळे एअर फ्रान्सचे विमान केनियामध्ये उतरवले

Next

ऑनलाइन लोकमत 

नैरोबी, दि. २०  - मॉरिशेसहून पॅरिसला जाणा-या एअर फ्रान्सच्या विमानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रविवारी केनियाच्या मोमबासा विमानतळावर विमानाचे इर्मजन्सी लँण्डीग करण्यात आले. एअर फ्रान्सचे बोईग ७७७ हे विमान केनियाच्या हद्दीतून जात असताना विमानातील शौचालयाजवळ  बॉम्बसदृश्य वस्तू आढळली.  

वैमानिकाने मोई इंटरनॅशनल विमानतळाशी संर्पक साधून इर्मजन्सी लँण्डीगची विनंती केली. त्यानुसार विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. विमानात ४५९ प्रवाशांसह १४ क्रू सदस्य होते. 
शनिवारी रात्री नऊ वाजता या विमानाने मॉरिशेसहून उड्डाण केले होते. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवण्यात आले असून, बॉम्ब एक्सपर्टनी ती बॉम्बसदृश्य वस्तू ताब्यात घेतली आहे. 

Web Title: Air France flight took off in Kenya due to the fear of the bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.