लँडिंगदरम्यान रनवेवरून घसरलं विमान अन् थेट गेलं समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:48 AM2018-09-28T10:48:19+5:302018-09-28T10:48:40+5:30
पॅसिफिक महासागराच्या किना-यावर वसलेल्या पापुआ न्यू गिनीतल्या विमानतळावरून एक विमान घसरलं आणि ते थेट समुद्रात गेलं.
नवी दिल्ली- पॅसिफिक महासागराच्या किना-यावर वसलेल्या पापुआ न्यू गिनीतल्या विमानतळावरून एक विमान घसरलं आणि ते थेट समुद्रात गेलं. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मायक्रोनेशियात एका विमानतळावर विमानानं लँडिंग केल्यानंतर ते रनवेवरून धावत होतं. परंतु त्याच दरम्यान वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला अन् ते थेट समुद्रात जाऊन घुसलं.
विमान रनवेवरून 160 मीटरपर्यंत पुढे गेलं. या विमानात 36 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्स होते. ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार, विमानानं सकाळी 9.30 वाजता विमानतळावर लँडिंग केलं. त्याच वेळी ते धावत असताना रनवेवर न थांबता थेट समुद्रात घुसलं. विशेष म्हणजे विमान सरळ समुद्रात गेल्यानंतर थांबलं.
दरम्यान, विमानामध्ये 36 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्स होते. Air Niuginiच्या बोइंग 737-800 या विमानात ही घटना घडली असून, सर्व प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.