हवामानाचा तडाखा; विमानात प्रवाशांचे ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:45 AM2019-07-13T04:45:19+5:302019-07-13T04:45:23+5:30
होनोलुलू : व्हँकुव्हरहून आॅस्ट्रेलियातील सिडनीला निघालेल्या एअर कॅनडाच्या विमानाला गुरुवारी हवामानात झालेल्या बदलाचा फटका बसून ते डचमळू लागले. त्यामुळे ...
होनोलुलू : व्हँकुव्हरहून आॅस्ट्रेलियातील सिडनीला निघालेल्या एअर कॅनडाच्या विमानाला गुरुवारी हवामानात झालेल्या बदलाचा फटका बसून ते डचमळू लागले. त्यामुळे विमानातील प्रवासी आपल्या आसनांवरून बाजूला फेकले गेले. जणू काही ते विमानातच उड्डाण करत होते. या घटनेत ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. नैसर्गिक संकटात सापडलेले हे विमान तातडीने होनोलुलू विमानतळावर उतरविण्यात आले. उड्डाणादरम्यान हवाई बेटांपासून दोन तासांवर आलेले असताना हवामानातील बदलाचा फटका या बोईंग विमानाला बसला. (वृत्तसंस्था)
३६ हजार फूट उंचीवरील घटना
च्३६ हजार फुट उंचीवरून हे विमान उड्डाण करत असताना हे सारे थरारनाट्य घडले. या विमानात २५९ प्रवासी व १५ कर्मचारी होते. होनोलूलू येथे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. त्यातील प्रवासी, कर्मचारी सुखरूप असल्याचे एअर कॅनडाच्या प्रवक्त्याने सांगितले.