फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळले, १४८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

By admin | Published: March 24, 2015 04:39 PM2015-03-24T16:39:08+5:302015-03-24T17:12:55+5:30

स्पेनहून जर्मनीला जाणारे एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळले असून अपघातात विमानातील १४८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

Airbus plane collapses in France, 148 deaths likely | फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळले, १४८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळले, १४८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Next

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. २४ - स्पेनहून जर्मनीला जाणारे एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळले असून विमानात १४२ प्रवासी व ६ कर्मचारी असे एकूण १४८ जण होते. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे. 

स्पेनमधील बार्सिलोना येथील १४२ प्रवाशांना घेऊन एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील डूसलडॉर्फच्या दिशेने निघाले होते. विमानात एकूण सहा कर्मचारी होते. फ्रान्सच्या हवाई क्षेत्रातून जात असताना आल्स पर्वताजवळ विमानाचा रडार यंत्रणेची संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास वैमानिकांशी संपर्क झाला होता. यानंतर काही वेळाने विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता.हे विमान आल्स पर्वत रांगाच्या परिसरात कोसळले असून विमानाचे अवशेष आढळल्याची माहिती फ्रान्स सरकारने दिली आहे. विमान ज्या भागात कोसळले तू भाग दुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विमानातील १४८ प्रवासी जीवंत असण्याची शक्यता फार कमी आहे अशी माहिती फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्यूअल वॉल्स यांनी केले आहे. अपघाताचे नेमके कार अद्याप समजू शकलेले नाही.

एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील जर्मन विंग्स या कंपनीचे होते. जर्मन विंग्स ही जर्मनीतील सर्वात स्वस्त सेवा देणारी एअरलाइन्स कंपनी आहे. अपघातातील जीवितहानी विषयी कंपनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही या अपघाताची माहिती घेत आहोत असे ट्विट कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

 

 

Web Title: Airbus plane collapses in France, 148 deaths likely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.