‘त्या’ विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला

By admin | Published: January 15, 2015 06:12 AM2015-01-15T06:12:37+5:302015-01-15T06:12:37+5:30

एअर एशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला असून, त्यातून राहिलेले मृतदेह बाहेर काढणे शक्य आहे,

'That' aircraft got the main skeleton | ‘त्या’ विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला

‘त्या’ विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला

Next

जकार्ता, सिंगापूर : एअर एशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला असून, त्यातून राहिलेले मृतदेह बाहेर काढणे शक्य आहे, असा विश्वास शोध अधिकाऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे वर काढलेल्या ब्लॅक बॉक्सचे रेकॉर्डही उलगडण्यात आले असून या विमान दुर्घटनेची सर्व माहिती लवकरच मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
सिंगापूर नौदलाच्या जहाजाने विमानाच्या मुख्य विभागाचा शोध लावला. सिंगापूरचे संरक्षणमंत्री एनजी हेन यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचा मुख्य सांगाडा मिळाल्याने आता या अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना थोडासा दिलासा मिळू शकतो. या विमानाचा मुख्य भाग मिळणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण याच भागात अधिकांश मृतदेह फसले आहेत. आतापर्यंत ४८ मृतदेह मिळाले असून, १६२ प्रवाशांपैकी ११४ मृतदेह अद्याप हाती लागलेले नव्हते. आता ते मिळण्याची आशा आहे. जावा समुद्राच्या तळातून या आठवड्यात विमानाचा डेटा रेकॉर्डर व कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर मिळाला आहे. या सर्व उपकरणातील माहिती मिळाल्यानंतर एअरबस ३००-२०० वरील रहस्य उलगडले जाईल. २८ डिसेंबरला या विमानाचा अपघात झाला होता, त्यात १६२ लोक मरण पावले होते. क्यूझेड ८५०१ हे विमान इंडोनेशियाच्या सुराबायाहून सिंगापूरला चालले होते.
या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी होऊन माहिती बाहेर पडण्यास एक महिना लागू शकतो. या अपघातग्रस्त विमानाचा शोध बहुराष्ट्रीय पथकाकडून घेतला जात आहे.
दरम्यान, आतापर्यंत हाती लागलेल्या ४८ मृतदेहांपैकी ३६ जणांची ओळख पटली आहे. १२ मृतदेह अद्याप ओळखले गेले नाहीत. हवामान वादळी असले तरीही बचावाचे काम चालूच राहील, असा विश्वास इंडोनेशियाच्या बचाव पथकाने प्रवाशांच्या नातेवाईकांना दिला आहे.

Web Title: 'That' aircraft got the main skeleton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.