अमेरिकेतील विमानसेवा ठप्प, ४०० हून अधिक उड्डाणे उशिराने, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:10 PM2023-01-11T18:10:19+5:302023-01-11T18:22:12+5:30

United States: अमेरिकेतील सर्व विमान उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने विमानतळांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.

Airline services in the US stopped, more than 400 flights delayed, the shocking reason came out | अमेरिकेतील विमानसेवा ठप्प, ४०० हून अधिक उड्डाणे उशिराने, धक्कादायक कारण आलं समोर

अमेरिकेतील विमानसेवा ठप्प, ४०० हून अधिक उड्डाणे उशिराने, धक्कादायक कारण आलं समोर

googlenewsNext

अमेरिकेतील सर्व विमान उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने विमानतळांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. तसेच प्रवासी आपापल्या विमानांची वाट पाहत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे किमान ४०० उड्डाणे लेट झाली आहेत. 

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) सांगितले की, देशभरामध्ये सिस्टिम खराब झाल्याने विमानांचे दळणवळण विस्कळीत झाले आहे. एफएएने दिलेल्या माहितीनुसार या तांत्रिक बिघाडामुळे NOTAMS चं अपडेशन थांबलं आहे. त्यामुळे विमाने वेळेवर उड्डाण वेळेवर उड्डाण करू शकत नाही आहेत.

एफएएने ट्विट करून सांगितले की, ते आपल्या नोटिस टू एअर मिशन्स सिस्टिमला रिस्टोअर करत आहेत. आम्ही व्हॅलिडेशन चेक करत आहोत. तसेच सिस्टिमला रिलोड करत आहोत. त्यामुळे नॅशनल एअरस्पेस सिस्टिम प्रभावित झाला आहे.  

Web Title: Airline services in the US stopped, more than 400 flights delayed, the shocking reason came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.