विमानतळावर उतरतानाच विमान घसरले, धावपट्टीवर उलटे-पालटे झाले, ८० जण करत होते प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:03 IST2025-02-19T14:02:36+5:302025-02-19T14:03:44+5:30
Airplane Crash In Canada: कॅनडामध्ये झालेल्या एका मोठा विमान अपघाताबाबतची थरारक माहिती समोर आली आहे. येथील टोरांटोमधील पियर्सन विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सचं एक विमान उतरताना दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत.

विमानतळावर उतरतानाच विमान घसरले, धावपट्टीवर उलटे-पालटे झाले, ८० जण करत होते प्रवास
कॅनडामध्ये झालेल्या एका मोठा विमानअपघाताबाबतची थरारक माहिती समोर आली आहे. येथील टोरांटोमधील पियर्सन विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सचं एक विमान उतरताना दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान धावपट्टीवर घसरले आणि उलटले.
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, मिनियापोलिस येथून येत असलेल्या डेल्टा फ्लाइटसोबत ही दुर्घटना घडली. या विमानामधून ७६ प्रवासी आणि चालक दलाचे ४ कर्मचारी प्रवास करत होते. ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी घडली.
दरम्यान, अपघातानंतरचे घटनास्थळाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये मित्सुबिशी सीआरजे-९००एलआर विमान धावपट्टीच्या बर्फाने आच्छादलेल्या पृष्टभागावर उलटं पडलेलं दिसत आहे. तर आपातकालिन कर्मचारी विमानावर पाण्याचा मारा करताना दिसत आहेत. अपघातादरम्यान टोरांटोमध्ये आलेल्या हिमवादळामुळे विमान काही प्रमाणात झाकोळलेलं दिसत आहे. विमानामधील सर्व प्रवाी आणि चालक दलाचा शोध लागला आहे, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.
Something’s going on in the skies, and it’s getting harder to ignore. Four major plane crashes. 85 lives lost. 15 aviation incidents in just the first six weeks of 2025.
— Brian Allen (@allenanalysis) February 17, 2025
And now, a Delta flight just flipped on the runway in Toronto, adding to the chaos.
So what’s changed?… pic.twitter.com/UYNMhkjx85
अधिकाऱ्यांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर घसरून उलटलं. मात्र त्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. हे विमान घसरून कसं काय उलटलं याबाबत अंदाज बांधणं सध्यातरी घाईचं ठरेल. मात्र हवामानामुळे असं घडलं असावं. अपघात झाला तेव्हा विमानतळावर हिमवृष्टी होत होती. तसेच ५२ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. तर तापमान उणे ८.६ डिग्री इतके होते.