अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक; इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी 30 शेतकरी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 02:48 PM2019-09-19T14:48:43+5:302019-09-19T14:52:59+5:30

अफगाणिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता.

Airstrikes in Afghanistan; instead of Isis terrorists 30 farmers killed | अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक; इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी 30 शेतकरी ठार

अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक; इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी 30 शेतकरी ठार

googlenewsNext

काबुल : गेल्या काहि दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान, इसिसचे दहशतवादी हल्ले होत असून दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांना लक्ष्य करण्यासाठी अफगाण हवाई दलाने बुधवारी रात्री एअर स्ट्राईकचे पाऊल उचलले. मात्र, इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी शेतकरीच ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने या कारवाईला समर्थन दिले आहे. 


अफगाणिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रपती घणी थोडक्यात बचावले होते. तसेच दोनवेळा अमेरिकेच्या दूतावासासमोर बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. यामुळे ही कारवाई हाती घेण्यात आली होती. आयएसआयएसचे दहशतवादी लपले असल्याचे वाटल्याने तेथे बॉम्ब टाकण्यात आला मात्र शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. 


पूर्वेकडील नापंगरहार प्रांताचे सदस्य सोहराब कादरी यांनी सांगितले की, ड्रोन हल्ल्यामध्ये शेतामध्ये काम करत असलेल्या 30 मजुरांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. काबुलच्या संरक्षण मंत्रालयानेही या एअरस्ट्राईकची माहिती दिली मात्र या हल्ल्यामुळे झालेले नुकसान सांगण्यास नकार दिला. 

Web Title: Airstrikes in Afghanistan; instead of Isis terrorists 30 farmers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.