इस्रायल: अल जझीरा वाहिनीच्या प्रसारणावर बंदी, पंतप्रधानांकडून 'दहशतवादी चॅनेल' असा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:38 AM2024-04-02T10:38:49+5:302024-04-02T10:41:06+5:30
Al Jazeera banned in Israel: अल जझीरा इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवत असल्याचाही केला आरोप
Al Jazeera banned in Israel, Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की ते अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर तात्काळ बंदी घालत आहेत. इस्रायलच्या संसदेने सोमवारी कायदा संमत केल्यानंतर नेतान्याहू यांनी अल जझीराला 'दहशतवादी वाहिनी' म्हणत ते बंद करण्याचा शब्द दिला. हा कायदा झाल्यानंतर सरकारला इस्रायलमधील अल जझीराचे प्रक्षेपण बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला. नेतन्याहू यांनी अल जझीरावर इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याचा तसेच ७ ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यात सहभागी असण्याचा आणि इस्रायलविरुद्ध हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच या वाहिनीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे नेतन्याहू यांनी सांगितले आहे.
नेतान्याहू काय म्हणाले?
"अल जझीरा इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवत आहे, ते ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडात सक्रियपणे सहभागी होते आणि IDF सैनिकांविरुद्ध चिथावणी देत होते," असा आरोप नेतन्याहू यांनी X वर केलेल्या पोस्टमधून केला. आता आपल्या देशातून हमासचे शोफर काढून टाकण्याची वेळ आली आहे. दहशतवादी वाहिनी अल जझीरा यापुढे इस्रायलमधून प्रसारित होणार नाही. चॅनलचे प्रक्षेपण थांबवण्यासाठी नवीन कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याचा माझा मानस आहे. अध्यक्ष ओफिर कॅट्झ यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांच्या पाठिंब्याने दळणवळण मंत्री श्लोमो कराई यांनी प्रोत्साहन दिलेल्या कायद्याचे मी स्वागत करतो.
אל ג׳זירה פגעו בביטחון ישראל, השתתפו באופן פעיל בטבח ה-7 באוקטובר, והסיתו נגד חיילי צה״ל. הגיע הזמן לסלק את השופר של החמאס מהמדינה שלנו.
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) April 1, 2024
ערוץ הטרור אל ג׳זירה לא ישדר יותר מישראל. בכוונתי לפעול מיידית בהתאם לחוק החדש כדי לעצור את פעילות הערוץ.
אני מברך על החוק שקידם שר התקשורת…
-------------
अल जझीरा मीडिया नेटवर्क हा कतारमधील एक मीडिया समूह आहे. याचे मुख्यालय दोहा येथील कतार रेडिओ आणि टेलिव्हिजन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समध्ये आहे. हे मीडिया समूह नेटवर्क अल जझीरा इंग्लिश, अल जझीरा अरेबिक, AJ+ तसेच इतर अनेक मीडिया आउटलेट चालवते. अल जझीरा मीडिया नेटवर्कला कतार सरकारकडून सार्वजनिक निधी प्राप्त होतो. असे असूनही ते स्वतःचा खाजगी मीडिया गट म्हणून वर्णन करतात. कतारी सरकारचा आपल्या बातम्यांवर प्रभाव असल्याचा दावाही अल जझीराने नाकारला आहे. अल जझीरा अनेकदा त्यांच्या मीडिया रिपोर्टिंगमुळे वादात सापडले आहे. या चॅनलवर कट्टर इस्लामकडे कल असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.