अल् कायदाची पाकमधील तय्यबा, ‘हक्कानी’ला मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:35 AM2019-07-31T06:35:06+5:302019-07-31T06:35:10+5:30

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : जवाहिरीच्या तब्येतीविषयी संदिग्धता

Al-Qaeda's help in Pak, 'Haqqani', UN Says | अल् कायदाची पाकमधील तय्यबा, ‘हक्कानी’ला मदत

अल् कायदाची पाकमधील तय्यबा, ‘हक्कानी’ला मदत

Next

नवी दिल्ली : अल् कायदा ही संघटना अद्याप सक्रिय असून, ती पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलइटी), हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी संघटनांना मदत करते. मात्र, अल् कायदाचा नेता आयमान मुहम्मद अल् जवाहिरी याची तब्येत कशी राहील तसेच त्याचे वारसदार कसे काम करतील याविषयी काहीही सांगणे अशक्य आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.

निर्बंध परीक्षण समितीने हा अहवाल तयार केला असून तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अल् कायदा निर्बंध समितीला सादर करण्यात आला. इस्लामिक स्टेट, अल् कायदा व या संघटनांशी संबंधित व्यक्ती, गट आदींवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्याबाबतचा अहवाल दर सहा महिन्यांनी संयुक्त राष्ट्रांना सादर करण्यात येतो. या अहवालात पुढे म्हटले आहे की, अल् कायदाच्या नेतृत्वाला अफगाणिस्तानातून कारवाया करणे अधिक सुरक्षित वाटते. तेथील तालिबान्यांशी या संघटनेचे अनेक वर्षांपासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. ताजिकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानातील शिघनान प्रांतात तसेच बर्मालमध्ये आपली पाळेमुळे पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नात अल् कायदा आहे. तालिबानच्या धार्मिक तसेच घातपाती कारवायांमध्ये अल्् कायदाचा सक्रिय सहभाग असतो. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लिव्हन्ट (इसिल) ही संघटनाही आपले जाळे विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे.

श्रीलंकेतील बॉम्बस्फोट स्थानिकांनी घडवले
च्सिरियातील इदलिब, सोमालिया, पश्चिम आफ्रिकेतील काही देश यांच्यात इसिलपेक्षा अल्् कायदा अधिक सक्रिय आहे. इदलिब, अफगाणिस्तानमध्ये कारवाया करीत असलेले विदेशी दहशतवादी अल् कायदाशी संबंधित आहेत.

च्श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमागे इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लिव्हन्टचा (इसिल) हात आहे, असे म्हटले जात असले तरी त्या घातपाताशी या संघटनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही.

च्इसिलच्या नेत्यांना असे काही घडणार आहे, हे माहितीही नव्हते. श्रीलंकेतील बॉम्बस्फोट स्थानिक दहशतवाद्यांनी घडविले असून, त्यांनी इसिलच्या विचारांपासून फक्त प्रेरणा घेतली होती. इसिलच्या नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क नव्हता असे या अहवालात म्हटले आहे.

Web Title: Al-Qaeda's help in Pak, 'Haqqani', UN Says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.