ना फाशी, ना विषारी इंजेक्शन थेट नायट्रोजन गॅसने मारले जातेय; अमेरिकेत कठोर शिक्षेला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:10 AM2024-02-23T11:10:42+5:302024-02-23T11:36:20+5:30
२५ जानेवारीला प्रथमच केनेथ स्मिथ या व्यक्तीला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्युदंड देण्यात आला होता आणि तिथे उपस्थित लोकांनी सांगितले की स्मिथला अनेक मिनिटे धक्के बसत राहिले आणि तो २२ मिनिटे तडफडत गेेला.
मोंटगोमरी : अलाबामामध्ये फाशीच्या शिक्षेतील ॲलन यूजीन मिलर या दोषीला नायट्रोजन गॅस देऊन मारण्यात येणार आहे. राज्यात फाशीच्या शिक्षेसाठी नायट्रोजन गॅसचा वापर केल्याची घटना महिनाभरापूर्वीच घडली होती. संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन आणि आता व्हाइट हाऊसनेही या शिक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ॲटर्नी जनरल ऑफिसने सांगितले की दोषी ॲलन यूजीन मिलरला नायट्रोजन हायपॉक्सिया देऊन फाशी दिली जाईल.
तडफडून होतो मृत्यू
२५ जानेवारीला प्रथमच केनेथ स्मिथ या व्यक्तीला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्युदंड देण्यात आला होता आणि तिथे उपस्थित लोकांनी सांगितले की स्मिथला अनेक मिनिटे धक्के बसत राहिले आणि तो २२ मिनिटे तडफडत गेेला.
ॲटर्नी जनरल स्टीव्ह मार्शल यांच्या कार्यालयाने ही पद्धत योग्य असल्याचे सांगितले आणि भविष्यातही फाशीच्या वेळी राज्य नायट्रोजन गॅसचा वापर करेल, असे सांगितले.
हा मानवांवर केलेला प्रयोग
फाशीची शिक्षा झालेल्या अन्य एका आरोपीने दाखल केलेल्या दाव्यात नायट्रोजन गॅसचा वापर बंद करण्याची विनंती केली आहे.
त्यात असे म्हटले आहे की घटनास्थळी उपस्थित लोक म्हणाले की हा “मानवांवर केलेला प्रयोग” आहे आणि तो यशस्वी मानला जाऊ शकत नाही.
असा दिला जातो नायट्रोजन गॅस
व्यक्तीला एका चेंबरमध्ये नेऊन स्ट्रेचरला बांधले जाते. मग तोंडावर मास्क घातला जातो. त्यानंतर त्यात नायट्रोजन वायू सोडला जातो.
श्वास घेताच हा वायू संपूर्ण शरीरात पसरतो आणि शरीराचे सर्व अवयव काम करणे बंद करतात.
नायट्रोजन वायू श्वासावाटे देऊन मृत्युदंड देणे म्हणजे तोंडाला प्लास्टिकने झाकून मारल्यासारखे आहे.
या शिक्षेचे धोके काय?
गॅसगळती होऊन खोलीत उपस्थित लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. नायट्रोजन गॅसचा वापर जर निरोगी लोकांवर केला तर त्यांना १५ ते २० सेकंदांत फेफरे येऊ लागतात
‘तो’ प्रयत्न अयशस्वी
मिलरला यापूर्वी सप्टेंबर २०२२मध्ये विषारी इंजेक्शनद्वारे शिक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यादरम्यान इंजेक्शनसाठी योग्य नस सापडली नाही, त्यानंतर ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती.