अलीबाबावर एका दिवसात १४ अब्ज डॉलर्सची विक्री

By admin | Published: November 12, 2015 11:48 PM2015-11-12T23:48:06+5:302015-11-12T23:48:06+5:30

जगातील सर्वात मोठ्या आॅनलाईन खरेदी दिनानिमित्त चीन आणि अन्य देशांच्या ग्राहकांनी तब्बल १४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ‘अलीबाबा डॉट कॉम’

Alibaab sells $ 14 billion in a day | अलीबाबावर एका दिवसात १४ अब्ज डॉलर्सची विक्री

अलीबाबावर एका दिवसात १४ अब्ज डॉलर्सची विक्री

Next

शांघाई : जगातील सर्वात मोठ्या आॅनलाईन खरेदी दिनानिमित्त चीन आणि अन्य देशांच्या ग्राहकांनी तब्बल १४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ‘अलीबाबा डॉट कॉम’ ने गुरुवारी जाहीर केले. एकाच दिवशी झालेल्या या विक्रमी खरेदी-विक्रीमुळे चीनच्या थंडावणाऱ्या आर्थिक विकासाबाबतची चिंताही किंचित कमी झाली आहे.
अलीबाबाने ११ नोव्हेंबर रोजी ‘सिंगल्स डे’ या नावाने आॅनलाईन शॉपिंगचे आयोजन केले होते आणि तो जगातील सर्वांत मोठा आॅनलाईन खरेदी महोत्सव बनला. अलीबाबा आपल्या प्लॅटफार्मच्या माध्यमातून विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी २००९ पासूनच अशाप्रकारच्या आॅनलाईन खरेदी महोत्सवाचे आयोजन करीत आहे.
कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १४.३ अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. तर गेल्या वर्षी याच महोत्सवात ९.३ अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तू विकण्यात आल्या होत्या.
हा दिवस चीनच्या घरगुती विक्रीची ताकद आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठी असलेली चीनच्या ग्राहकांची जबरदस्त मागणी यांचे निदर्शक आहे, असे अलीबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झांग यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Alibaab sells $ 14 billion in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.