‘अलीबाबा’ अचानक उगवले पाकिस्तानात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:29 AM2023-07-04T08:29:20+5:302023-07-04T08:29:31+5:30
पाकिस्तानातील ‘बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट’चे (बीओआय) माजी चेअरमन मुहम्मद अजफर अहसान यांनी जॅक मा यांच्या पाकिस्तान दौऱ्याला दुजोरा दिला आहे.
इस्लामाबाद : चिनी अब्जाधीश आणि अलीबाबा उद्योग समूहाचे सहसंस्थापक जॅक मां यांनी अचानक पाकिस्तान दौरा केला आहे. जॅक मा यांचा हा दौरा इतका गोपनीय होता की, पाकिस्तानातील चिनी दूतावासालाही त्याची माहिती देण्यात आलेली नव्हती.
पाकिस्तानातील ‘बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट’चे (बीओआय) माजी चेअरमन मुहम्मद अजफर अहसान यांनी जॅक मा यांच्या पाकिस्तान दौऱ्याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, २९ जून रोजी जॅक मा हे लाहोरला पोहोचले. २३ तास ते पाकिस्तानात होते. ३० जून रोजी ते चीनमध्ये परतले. पाकिस्तानात जाण्यापूर्वी जॅक मा हे नेपाळमध्ये काठमांडू येथील द्वारका हाॅटेलात थांबले होते. या दौऱ्यात मा यांनी सरकारी अधिकारी आणि माध्यमांशी बोलण्याचे टाळले. ते एका खासगी ठिकाणी थांबले होते. ३० जून रोजी ते आधी उझबेकिस्तानला आणि तेथून चीनला रवाना झाले. (वृत्तसंस्था)