Alibaba's Jack Ma Retires: 'अलीबाबा'ला धक्का; जॅक मा यांनी वाढदिनीच घेतली निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:17 PM2019-09-10T13:17:41+5:302019-09-10T13:18:27+5:30
Alibaba's Jack Ma Retires : जॅक मा यांनी निवृत्तीनंतर काय करणार याचा आधीच विचार केलेला होता.
चीनची ऑनलाईन शॉपिंग कंपनी अलीबाबाच्या मालकाने वाढदिवशीच निवृत्ती जाहीर केल्याने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जॅक मा यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. एक शिक्षक ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणारे जॅक मा पुन्हा शिक्षकी पेशा स्वीकारणार आहेत.
जॅक मा यांनी निवृत्तीनंतर काय करणार याचा आधीच विचार केलेला होता. तसेच त्यांनी अलीबाबाचा प्रचंड डोलारा सांभाळण्यासाठीही जबाबदार व्यक्तीचा शोध घेतला होता. जॅक मा यांचे काम डेनियल झांग पाहणार आहेत. जॅक मा यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे खळबळ उडाली असून त्यांच्याशिवाय अलीबाबा कशी चालेल असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
जॅक मा यांचा प्रवास प्रेरणादायी झाला आहे. एका गरीब परिवारात जन्माला आलेले मा हे अब्जाधीश बनले. त्यांच्या वडीलांनी 40 डॉलरच्या पेन्शनमध्ये घर चालविले होते. त्यांचे आई-वडील कमी शिकलेले होते. मा यांनी हांगझू टीचर्स कॉलेजमधून इंग्रजीमध्ये पदवी घेतली होती. त्यांनी एका विद्यापीठामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. अब्जाधीश बनण्याचा प्रवास खूप संकटांनी भरलेला आहे. त्यांनी केएफसीमध्येही नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नव्हती. एवढेच नाही तर मा यांना जवळपास 30 कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला होता.
यानंतर जॅक मा यांनी व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख बनविली. 21 फेब्रुवारी 199 मध्ये अलीबाबा कंपनी स्थापन केली. यासाठी त्यांनी 17 मित्रांची मदत घेतली. सुरूवातीला त्यांना संकटांचा सामना करावा लागला. मात्र, नंतर त्यांच्या कंपनीने उसळी घेत जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.