स्टॅम्पएवढ्या हार्ड डिस्कवर जगातील सर्व पुस्तके
By admin | Published: July 20, 2016 05:49 AM2016-07-20T05:49:35+5:302016-07-20T05:49:35+5:30
जगभरात आजवर प्रसिद्ध झालेली सर्व पुस्तके पोस्टाच्या स्टॅम्पएवढ्या छोट्याशा हार्ड डिस्कवर साठवून ठेवता येतील
लंडन : जगभरात आजवर प्रसिद्ध झालेली सर्व पुस्तके पोस्टाच्या स्टॅम्पएवढ्या छोट्याशा हार्ड डिस्कवर साठवून ठेवता येतील, असा डेटा स्टोअरेजच्या तंत्रातील क्रांतिकारी शोध वैज्ञानिकांनी लावला आहे.
दररोज अब्जावधी गिगाबाईट््स एवढी विविध प्रकारचा नवा डेटा निर्माण होत असतो. हा सर्व डेटा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवून ठेवायचा असेल तर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त डेटा साठवता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज वाढत आहे. परंतु ‘कावली इन्स्टिट्यूट आॅफ नॅनोटेक्नॉलॉजी’ ने हा शोध लावून मोठी कामगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)
>फेनमॅन यांनी अशी कल्पना मांडली होती की, प्रत्येक अणूची आपल्याला एखाद्या पृष्ठभगावर शिस्तबदंध पद्धतीने मांडणी करता आली तर प्रत्येक अणूएवढ्या जागेवर माहितीचा एक कण साठविणे आपल्याला शक्य होईल.
कसे काम करणार तंत्रज्ञान
एका अणूएवढ्या जागेवर अफाट माहिती साठविणे कसे शक्य होते याचे ओत्ते यांनी स्पष्ट केलेले तंत्र थोडक्यात असे सांगता येईल:
माहितीचा प्रत्येक कण तांब्याच्या अणूच्या पृष्ठभागावर दोन ठिकाणी असू शकतो. या दोन जागांमध्ये क्लोरिनचा एक अणू मागे-पुढे सरकवून बसविता येऊ शकतो. क्लोरिनचा अणू वरच्या जागेवर असेल तर त्याच्याखाली खड्डा असतो. त्याला ‘वन’ म्हणू. हा खड्डा वर असेल व त्याखाली क्लोरिनचा अणू असेल तर हा कण ‘झिरो’ होतो.
क्लोरिनच्या अणूच्या सभोवती, फक्त खड्याच्या जागी वगळून, क्लोरिनचेच आणखी अणू असल्याने ते एकमेकांना योग्य जागी ठेवतात.
सुट्या अणूपेक्षा ही खड्यांची पद्धत डेटा स्टोअरेजसाठी अधिक उपयुक्त ठरते. अशा प्रकारे वैज्ञानिकांनी त्यांची डेटा मेमरीची रचना आठ बाईट््सच्या ब्लॉकमध्ये केली.
मायक्रोस्कोपचा केला वापर
या सिद्धांतांचा वापर करण्यासाठी या वैज्ञानिकांनी ‘स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप’चा उपयोग केला. यात या दुर्बिणीची अत्यंत सूक्ष्म सुई एखाद्या पृष्ठभागाच्या अणूंचा एक एक करून शोध घेते. यामुळे वैज्ञानिकांना प्रत्येक अणू वेगळा पाहता येतो एवढेच नव्हे तर अणूंची सुव्यवस्थित रचनेत मांडणी करणेही शक्य होते.