बापूंच्या पणतीवर फसवणुकीचा आरोप
By admin | Published: October 21, 2015 02:22 AM2015-10-21T02:22:24+5:302015-10-21T02:22:24+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यावसायिकांची ८ लाख ३० हजार डॉलरहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
जोहान्सबर्ग : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यावसायिकांची ८ लाख ३० हजार डॉलरहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
चोरी आणि फसवणूकप्रकरणी आशिष लता रामगोबिन सोमवारी दर्बान येथील न्यायालयात हजर झाल्या. खासगी रुग्णालय समूह ‘नेटकेयर’साठी भारताकडून बिछान्यांच्या आयातीचा मोठा ठेका मिळाल्याचे सांगून दोन स्थानिक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नफ्यातील मोठा वाटा देण्याचे आमिष दाखविल्याने एस. आर. महाराज या व्यावसायिकाने त्यांना ६२ लाख रँड (आफ्रिकी चलन) एवढी रक्कम दिली. एवढेच नाही तर रामगोबिन यांनी महाराज यांना या कंटेनरांचे (कागदावरील) आयातकराशी संबंधित मुद्दे सोडविण्याची विनंतीही केली होती. अशाच प्रकारे त्यांनी दुसऱ्या एका व्यावसायिकाची फसवणूक करून त्याच्याकडूनही ५२ लाख रँड उकळल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)