बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By प्रविण मरगळे | Published: October 2, 2020 10:55 PM2020-10-02T22:55:19+5:302020-10-02T22:56:12+5:30

Amazon workers Coronavirus News: कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करता अ‍ॅमेझॉन अन्य सुरक्षा उपायांसह चाचण्यांवर कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहे असं कंपनीने म्हटलं आहे.

Almost 20,000 Amazon workers in US test positive for Covid-19 | बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Next

सॅन फ्रान्सिस्को: ई कॉमर्स जगातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉनचे जवळपास २० हजार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मार्चपासून सप्टेंबरपर्यंतची आहे. कंपनीने कोरोना संक्रमित डेटा जारी करत सांगितले की, अमेरिकेच्या सर्व वेयरहाऊसमध्ये काम करणारे १९ हजार ८१६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वी कोरोना महामारीच्या काळात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा उपायांबद्दल आजीमाजी कर्मचाऱ्यांकडून टीका झाल्यानंतरही डेटा शेअरिंग करण्याकडे दुर्लक्ष केले. गुरुवारी, अ‍ॅमेझॉनने सर्व गोदामांमधील आणि फूड मार्केटमध्ये काम करणाऱ्या १३ लाख ७० हजार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली, त्यानंतर हा डेटा जारी केला आहे. हा अहवाल १ मार्च ते १९ सप्टेंबर या कालावधीत कंपनीत उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चाचणीवरुन केला आहे.

अ‍ॅमेझॉनने सांगितले की, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी दररोज कोरोना चाचणी करत आहे आणि नोव्हेंबरपासून दिवसेंदिवस चाचण्यांची संख्या वाढवून ५० हजारपर्यंत करणार आहे. कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करता अ‍ॅमेझॉन अन्य सुरक्षा उपायांसह चाचण्यांवर कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहे असं कंपनीने म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह

सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. होप हिक्स, कोणतीही सुट्टी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. माझी पत्नी मेलानिया आणि मी आमच्या चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. यादरम्यान आम्ही क्वारंटाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असे ट्रम्प त्यांनी म्हटले होते. आता कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Almost 20,000 Amazon workers in US test positive for Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.