अमेरिकन लढाऊ विमानांनी केली कोरियावरून उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:17 AM2017-07-31T02:17:12+5:302017-07-31T02:17:28+5:30
उत्तर कोरियाने शुक्रवारी केलेली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी आणि त्याआधी केलेली अग्णिबाणाची चाचणी याला उत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या दोन बी -१ बी लढाऊ विमानांनी कोरियन व्दिपकल्पावरुन उड्डाणे केली.
वॉशिंग्टन / स्योल : उत्तर कोरियाने शुक्रवारी केलेली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी आणि त्याआधी केलेली अग्णिबाणाची चाचणी याला उत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या दोन बी -१ बी लढाऊ विमानांनी कोरियन व्दिपकल्पावरुन उड्डाणे केली.
अमेरिकेच्या विमानांनी दहा तासांच्या व्दिपक्षीय मोहिमेत भाग घेताना हा सराव केला. उत्तर कोरियाने शुक्रवारी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर किम जोंग उन यांनी म्हटले होते की, आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही लक्ष्याचा वेध घेऊ शकतो. पॅसिफिक एअर फोर्सेज कमांडर जनरल टैरेंस ओ शॉनेसी यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरिया हा क्षेत्रीय स्थिरतेवरील धोका बनला आहे. जर गरज पडली तर आम्ही जलद, घातक आणि प्रचंड बळाने आपल्या वेळेनुसार आणि स्थानावरुन उत्तर देण्यास तयार आहोत.
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत तज्ज्ञांचे असे मत आहे की, ४ जुलै रोजी केलेल्या चाचणीपेक्षा हे क्षेपणास्त्र अधिक शक्तिशाली आहे. दहा हजार किमीच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता यात आहे. म्हणजेच अमेरिकेतील प्रमुख शहरांपर्यंत पोहचण्याची याची क्षमता आहे. उत्तर कोरियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, क्षेपणास्त्राची चाचणी अमेरिकेसाठी इशारा आहे. उत्तर कोरियाविरुद्धचे प्रतिबंध आणि आमच्या देशाविरुद्ध दबाव वाढविण्याची मोहिम अमेरिका राबवत आहे. (वृत्तसंस्था)