श्रवणयंत्राद्वारे पहिल्यांदा आईचा आवाज ऐकल्यानंतर मुलगी झाली अशी भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 03:20 PM2017-11-15T15:20:43+5:302017-11-15T15:41:59+5:30
कानाचं मशिन लावल्यानंतर आईचा आवाज पहिल्यांदा ऐकताना त्या बाळाचे भावना अनावर झाल्या होत्या.
अमेरिका - जन्माला आलेली चिमुकली केव्हाच ऐकू शकणार नाही, असं जेव्हा डॉक्टरांकडून बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्याच मिनिटाला सांगण्यात येतं तेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यात एक वेगळीच चिंता लागलेली दिसते. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला. एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या चिमुकलीला ऐकण्याचा त्रास होता. त्यामुळे जन्माला आल्यापासून तिने कोणाचाच आवाज ऐकला नव्हता. मात्र श्रवण यंत्रामुळे तिने जेव्हा आईचा पहिल्यांदाच आवाज ऐकला तेव्हा ती चिमुकलीही भावूक झाली आणि हे भावुकपण तिच्या डोळ्यातून अलगद दिसूही लागलं.
अमेरिकेत क्रिस्टी किनी या आईने ऑगस्ट २०१७ साली एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. या गोंडस परीला कायमचा बहिरेपणा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आईचा एक शब्दही ती ऐकू शकणार नव्हती. ऐकू शकणार नाही म्हटल्यावर तिच्याकडून कोणत्याच प्रत्युत्तराचीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे जन्मापासून जगाचा आवाज न ऐकणाऱ्या चेरीसाठी त्यांनी उत्तमोत्तम उपचार करायचे ठरवले. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चेरीला श्रवण यंत्र देण्यात आलं. या श्रवणयंत्राच्या माध्यमातून ती उत्तम ऐकू शकते. ते श्रवण यंत्र चेरीच्या कानात घातल्यावर पहिल्यांदाच तिच्या आईने चेरीला हेल्लो केलं, तेव्हा आपल्या आईचे पहिलेच शब्द एकून चिमुकलीही भावूक झाली आणि तिनेही डोळ्यातून प्रत्युत्तर दिले.
मायलेकीचा हा सगळा संवाद व्हिडिओमध्ये कैद करण्यात आलाय. क्रिस्टी किनी यांनी हा व्हिडिओ यु-ट्युबवर शेअर करताच तिच्या परिचयाचे सगळेच भाऊक झाले. आईचा पहिला शब्द ऐकताच डोळ्यांवाटे चिमुकलीने दिलेले प्रत्युत्तर पाहून सर्वच भावूक झाला. या व्हिडिओमध्ये आई तिला 'आय लव्ह यू' म्हणते आणि चिमुकल्या चेरीच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे भाव दिसू लागतात. अवघ्या चार महिन्याची ही गोड परी आपल्या आईच्या प्रत्येक शब्दाला डोळ्यांतून उत्तर देतेय, हे पाहून सगळेच भावूक व्हाल. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
सौजन्य - www.scubby.com