दोन कुत्र्यांतील आश्चर्यजनक भावनात्मक नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 12:39 AM2017-06-15T00:39:02+5:302017-06-15T00:39:02+5:30
दोन कुत्र्यांची ही कथा ऐकून तुमचे डोळे पाणावतील. दोन कुत्र्यांतील भावनात्मक नात्याची ही कथा माणसांनाही विचार करायला लावणारी आहे.
वॉशिंग्टन : दोन कुत्र्यांची ही कथा ऐकून तुमचे डोळे पाणावतील. दोन कुत्र्यांतील भावनात्मक नात्याची ही कथा माणसांनाही विचार करायला लावणारी आहे. ही कथा आता टिष्ट्वटरवर व्हायरल झाली आहे.
अमेरिकेतील चित्रपट निर्माते ईस्टन डफर यांनी टिष्ट्वटर हँडल ईझीब्रिझीवर आपल्या दोन कुत्र्यांची तशी सामान्यच, परंतु हृदयाला हात घालणारी कथा शेअर केली आहे. ईस्टन यांच्याकडे दोन लॅब्राडोर कुत्र्यांना खाऊ घालायला एकच भांडे होते. कुत्र्यांची नावे स्टिच व कुकी होती. कुकीचे वय कमी होते. स्टिच नेहमी भांड्यात मिळणारा पदार्थ अर्धा कसा खायचा हे तिला शिकवायचा म्हणजे राहिलेला अर्धा तो खाऊ शकेल. आता स्टिच या जगात नाही. ईस्टनही आता कुकीला आधीपेक्षा कमी जेवण देतात. कारण आता ती एकटीच आहे. परंतु ईस्टन यांच्या हे लक्षात आले की, कुकी आतादेखील आधीसारखेच अर्धे जेवण स्टिचसाठी ठेवते. ही दु:खी करणारी कथा वाचून टिष्ट्वटरवर शोक व्यक्त करणाऱ्यांची संख्या फार मोठी होत आहे.