आश्चर्य! पुढच्या आठवड्यात ग्रेज्युएट होणार हा 14 वर्षांचा मुलगा; इलॉन मस्क यांच्या SpaceX नं दिली नोकरी, असं आहे टॅलेन्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:28 AM2023-06-12T10:28:05+5:302023-06-12T10:31:08+5:30
...यावरून या या मुलाच्या टॅलेन्टचा अंदाज लावता येऊ शकतो.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका केवळ 14 वर्षांच्या मुलाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क, यांच्या SpaceX कंपनीने नोकरी दिली आहे. हा मुलगा पुढच्याच आठवड्यात ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे. यावरून या या मुलाच्या टॅलेन्टचा अंदाज लावता येऊ शकतो. कॅरन काझी, असे या मुलाचे नाव आहे.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरन पुढील आठवड्यात सांता क्लारा युनिव्हर्सिटीमधून ग्रेज्युएशन पूर्ण करेल. युनिव्हर्सिटीतून डिग्री मिळवणारा हा सर्वात कमी वयाचा मुलगा आहे. यानंतर तो पुढील महिन्यात SpaceX मध्ये आपल्या नोकरीलाही सुरुवात करेल. कॅरन कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मिळवेल. याच मुळेच त्याला स्पेसक्राफ्ट बनवणारी कंपनी SpaceX ने नोकरी दिली आहे. कॅरन हा लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे, असे त्याचे कुटुंबीय सांगतात.
11 साल की उम्र में यूनिवर्सिटी में दाखिला -
कॅरनने सांगितले की, "कुठलीही गोष्ट तत्काळ शिकण्याच्या माझ्या क्षमतेमुळे, माझ्यासाठी मेन स्ट्रीम एजुकेशन योग्य मार्ग नाही, हे मी तिसऱ्या वर्गात असतानाच माझे शिक्षक, पालक आणि बाल रोग तज्ज्ञांना लक्षात आले." कॅरनच्या कुटुंबीयांना लक्षात आले की, त्याचा IQ फार अधिक आहे. त्याच्या अंगी इमोशनल इंटेलीजन्स देखील आहे. ज्यामुळे तो इतर मुलांच्या तुलनेत अधिक परिपक्व आहे. त्याला 9 वर्षांचा असतानाच लॉस पोसीटास कम्युनिटी कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. यानंतर तो 11 वर्षांचा असताना युनिव्हर्सिटीत गेला.
अपार्टमेन्टमध्ये आई सोबत राहतो कॅरन -
कॅरनने म्हणतो, त्याला कॉलेजमध्ये शिकताना अत्यंत आनंद वाटला. त्याने इंटेल लॅब्समध्ये इंटर्न म्हणूनही काम केले. येथील लोकांचे म्हणे आहे की, कॅरनने आपले बालपन गमावले आहे. मात्र, असे काही नाही, असे त्याचे म्हणणे आहे. उलट तो, मिळालेल्या या मोठ्या संधींचे कौतुक करतो. कॅरनने म्हटल्यानुसार, 'मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून SpaceX मध्ये नोकरी करणार आहे.' कॅरन त्यच्या आईसोबत एक अपार्टमेन्टमध्ये राहतो. आता जुलै महिन्यात SpaceX च्या स्टारलिंक टीमसोबत नोकरी सुरू करण्यासाठी तो वॉशिंग्टनला शिफ्ट होण्याची तयारी करत आहे.