Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत कोरोनाने घेतला 8,713 जणांचा बळी, पाहा काय सांगते आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 11:26 AM2020-04-09T11:26:42+5:302020-04-09T12:00:49+5:30
अमेरिकेत आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ लाख ९७ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9279 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर आतापर्यंत २२ हजार ८९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : कोरोनाने इटली आणि स्पेननंतर आता अमेरिकेत थैमान घालायला सुरुवात केली आहे. येथेही आता मृत्यूचे तांडव सूरू झाले आहे. कोरोनापुढे महासत्ता म्हणवली लाणारी अमेरिका निष्प्रभ ठरताना दिसत आहे. बरोब्बर ७५ वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर आणि ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या हल्ल्यांतही अमेरिकेचे जेवढे नुकसान झाले नसेल, तेवढे नुकसाना या व्हायरसने केले आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 4 लाख 34 हजार 927 जनांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मरणारांचा आकडा १४ हजार ७८८ वर जाऊन पोहोचला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील ८ हजार ७१३ जणांचा अवघ्या ५ दिवसांत मृत्यू झाला आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात यायला तयार नाही. आता येथे 31 हजार 935 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत.
जवळपास 2 हजार जणांचा एकादिवसात मृत्यू -
अमेरिकेसाठी मंगळवार पाठोपाठ बुधवारही शोकाकूल ठरला. येथे मंगळवारी १९३९ जणांचा तर बुधवारी १९७३ जणांचा मृत्यू झाला. हा अमेरिकेतील एकाच दिवसातील सर्वाधिक मृत्यूचा आकडा आहे.
आकडे काय सांगतात सांगतात -
अमेरिकेत आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ लाख ९७ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9279 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर आतापर्यंत २२ हजार ८९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 एप्रिलपर्यंत मृतांचा आकडा होता 6075 वर -
अमेरिकेत 3 एप्रिलपर्यंत 6075 जणांचा मृत्यू झाला होता. आता 9 ऐप्रिलला हा आकडा दुप्पटहून अधिक म्हणजे १४ हजार ७८८ वर जाऊन पोहोचला आहे.
न्यूयॉर्कमध्ये एका दिवसांत सर्वाधिक मृत्यू -
कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराला बसला आहे. येत एकाच दिवसात 779 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथील मरणारांचा आकडा दिवसागणिक वाढण्याचीही शक्यता आहे. ११ सप्टेंबरच्या (९/११) दहशतवादी हल्ल्यात २ हजार ७५३ जणांचा मृत्यू झाला होता. तर कोरोना व्हायरसमुळे एकट्या न्यू यॉर्कमध्येच आतापर्यंत ६ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे, असे न्यूयार्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.