अमेरिका नेहमीच स्थलांतरितांचा देश
By Admin | Published: July 6, 2014 02:26 AM2014-07-06T02:26:24+5:302014-07-06T02:26:24+5:30
परदेशात जन्मलेले दोन डझनहून अधिक सैनिक आज अमेरिकेचे नागरिक बनले. स्थलांतरितांचे स्वागत करणो हा अमेरिकी जीवनपद्धतीचा केंद्रबिंदूच आहे,
वॉशिंग्टन : परदेशात जन्मलेले दोन डझनहून अधिक सैनिक आज अमेरिकेचे नागरिक बनले. स्थलांतरितांचे स्वागत करणो हा अमेरिकी जीवनपद्धतीचा केंद्रबिंदूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन सोहळा 4 जुलैला पार पडला. या निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.
ओबामा यांनी स्थलांतरितांसाठी नव्याने धोरण बनविण्याचे आश्वासन दिले. गेल्या 2क्क् वर्षाचा इतिहास आणि अनुभव यावरून अमेरिका हा नेहमीच स्थलांतरितांचा प्रदेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. पृथ्वीवरील एक महान देश म्हणून अमेरिकेचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी या पद्धतीत आणखी काही बदल करणो आवश्यक असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले. 238 वर्षापूर्वी देशाची स्थापना झाल्यापासून अमेरिका एक शक्तिशाली लोकशाही, अर्थव्यवस्था आणि लष्करी शक्ती म्हणून जगाला परिचित आहे.
अमेरिकेच्या 238 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी वॉशिंग्टन येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पूर्व किना:यावर ‘ऑर्थर’ वादळ धडकल्याने या भागातील समारंभांवर प्रतिकूल परिणाम झाला.
4अमेरिकेत दिलेल्या योगदानासाठी स्वातंत्र्यदिनी न्यूयॉर्कमध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, अभिनेता आसिफ मांडवी, कार्नेगी मेलन विद्यापीठाचे अध्यक्ष सुब्रा सुरेश आणि वेस्ट जार्जिया विद्यापीठाचे माजी अध्यक्ष बेहेरूज सेथना या चार अनिवासी भारतीयांचा गौरव करण्यात आला