CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:39 PM2020-04-30T17:39:29+5:302020-04-30T17:49:21+5:30
भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे.
न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकन सरकारने यूएसएआयडीच्या माध्यमातून कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला अतिरिक्त 30 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 6 एप्रिलला यूएसएआयडीने कोरोनाचा सामना करण्यासाठी 29 लाख अमेरिकन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होती. आधीच आपल्या देशासाठी भल्या मोठ्या पॅकेजची घोषणा केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जगातील इतर देशांसाठीही मदतीचा हात देत आहेत.
लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम
भारत-अमेरिका भागीदारी -
भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकन एजन्सी यूएसआयडी ही जागतीक पातळीवरील मदत करणाऱ्या प्रमुख एजन्सींपैकी एक आहे. आतापर्यंत यूएसएआयडीने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला 59 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत केली आहे.
...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी
आणखी 64 देशांना अमेरिकेची मदत -
अमेरिकेने भारताशिवाय इतर 64 देशांनाही 13 अब्ज रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. हे सर्व असे देश आहेत, जेथे कोरोनाव्हायरस वेगाने पसरत आहे. यासंदर्भात अमेरिकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की ही मदत भारताला लॅबसह इतर वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यासाठी देण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेने श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तानलाही आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना