अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:28 PM2021-06-25T16:28:58+5:302021-06-25T16:32:10+5:30

अमेरिकेने चीनच्या शत्रूला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे.

America approves sale of f-16 fighter jets missiles to the philippines against war with china | अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार

अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकेने चीनचा शत्रू असलेल्या फिलिपिन्सला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे. अमेरिका आणि फिलिपिन्स यांच्यात झालेला हा व्यवहार एकूण 2.5 बिलियन डॉलरहून अधिकचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या फिलिपिन्स चीनच्या आक्रामक नीतीचा सामना करत आहे. यामुळेच, दक्षीण चीन समुद्रात चीनसोबत युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी म्हटले होते. (America approves sale of f-16 fighter jets missiles to the philippines against war with china)

बऱ्याच दिवसांपासून मल्टीरोल लढाऊ विमानांच्या शोधात होता फिलिपिन्स -
फिलिपिन्स बऱ्याच दिवसांपासून एका नव्या मल्टीरोल फायटर एयक्राफ्टच्या शोधात होता. यासाठी त्याने अमेरिकेच्या एफ-16 (General Dynamics F-16 Fighting Falcon) आणि साबच्या ग्रिपिन (Saab JAS 39 Gripen)ला शॉर्टलिस्ट केले होते. कारण शस्त्रांची खरेदीदेखील आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीअंतर्गतच केली जाते. अखेर, अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिनच्या लढाऊ विमानांना प्राधान्य देण्यात आले.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

12 एफ-16 लढाऊ विमानांच्या विक्रीला मंजुरी -
पेंटागॉनने म्हटले आहे, की फिलिपिन्सने लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केलेले 10 F-16C ब्लॉक 70/72 विमान आणि दोन F-16D ब्लॉक 70/72 विमान मागितले होते. 2.43 बिलियन डॉलरच्या या पॅकेजमध्ये लढाऊ विमानाचे पार्ट्स आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे. या डीमध्ये F-16 च्या विक्रीत उपकरणांच्या एका मोठ्या यादीचाही समावेश आहे. यात स्पेअर इंजीन, अॅडव्हाँस्ड इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड एरे (AESA) रडार, टॅक्टिकल कंप्यूटर, AMRAAM मिसाईल, मिसाईल लॉन्चर, स्नायपर टार्गेटिंग पॉड्स, एक इलेक्ट्रॉनिक वारफेअर सूट, दोन डझनहून अधिक शस्त्रांचा समावेश आहे. 

दोन विध्वंसक मिसाईल्सचीही विक्री करतोय अमेरिका -
पेंटॉगनने गुरुवारी काँग्रेसला फिलिपिन्सला दोन मिसाईल पॅकेजच्या संभाव्य विक्रीसंदर्भातही माहिती दिली. यात पहिल्या 12 च्या संख्येत हार्पून एअर लॉन्च ब्लॉक II मिसाईल आहे. या पॅकेजमध्ये दोन प्रशिक्षण मिसाइल्स, पार्ट्स आणि बोइंगच्या तयार करण्यात आलेल्या उपकरणांचाही समावेश आहे. या पॅकेजची किंमत 120 मिलियन डॉलरपर्यंत होती. दुसरी डील दुसरा 24 AIM-9X Sidewinder Block II टॅक्टिकल मिसाइलसंदर्भात करण्यात आली आहे. ही डील 42.4 मिलियन डॉलरमध्ये झाली आहे.

व्हाइटसन रीफवरून चीनसोबत तणाव -
चीन आणि फिलिपिन्स यांच्यात व्हाइटसन रीफवरून वाद आहे. संपूर्ण दक्षीण चीन समुद्रावर चीन दावा करतो. यात व्हाइटसन रीफचाही समावेश आहे. तर, हे रीफ आपले अभिन्न अंग आहे, असे  फिलिपिन्स म्हणतो. काही दिवसांपूर्वीच व्हाइटसन रीफजवळ चीनचे जवळपास 250 जहाज दिसून आले होते. हे जहाजं चिनी पिपल्स लिब्रेशन आर्मी मिलिशियाशी संबंधित होते.
 

Web Title: America approves sale of f-16 fighter jets missiles to the philippines against war with china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.