अमेरिका गरीब देश बनलाय - ट्रम्प
By admin | Published: March 20, 2016 03:56 AM2016-03-20T03:56:55+5:302016-03-20T03:56:55+5:30
दुबई आणि चीनमधील पायाभूत सुविधांशी तुलना करता अमेरिका आता तिसऱ्या जगतातील देश (विकसनशील देशांबाबत ही संज्ञा वापरली जाते.) बनला असून, आपण
वॉशिंग्टन : दुबई आणि चीनमधील पायाभूत सुविधांशी तुलना करता अमेरिका आता तिसऱ्या जगतातील देश (विकसनशील देशांबाबत ही संज्ञा वापरली जाते.) बनला असून, आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ही परिस्थिती वेगाने बदलेल, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी ते सध्या प्रचार करीत आहेत.
उताह येथील साल्ट लेक सिटीत समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले की, एकदा दुबई, चीनला जाऊन तेथील रस्ते, रेल्वे मार्गांचे जाळे पाहा. तेथे ताशी शेकडो मैल धावणाऱ्या बुलेट ट्रेन आहेत आणि तुम्ही न्यूयॉर्कला गेलात तर तुम्हाला सर्वकाही १०० वर्षांपूर्वीचे दिसेल. आपण निवडून येताच ही परिस्थिती बदलेल. आपल्या नेतृत्वाखाली अमेरिका इसिसला धूळ चारेल. आम्ही संपत्ती परत मिळवणार आहोत. कारण, आमचा देश गरीब बनला आहे. तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही एवढी प्रचंड तूट आहे. (वृत्तसंस्था)