अमेरिकेतील बायडन सरकारचा महत्त्वाचा निर्णय; लाखो भारतीयांना मिळणार मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:17 AM2024-06-22T10:17:51+5:302024-06-22T10:18:33+5:30
अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी भारतीय मतदारांना आकर्षिक करण्यासाठी तेथील प्रशासनन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
वॉश्गिंटन - अमेरिकत वर्षोनुवर्षे राहणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्डसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. अमेरिकन सरकारने त्यांच्या इमिग्रेशन धोरणातंर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचाराचा एक भाग होता. त्यामुळे ज्यो बायडन प्रशासनाने विना दस्तावेज अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे घर आणि नागरिकता देण्याचा निर्णय घेतला आहे.पॅरोल इन प्लेस पॉलिसी ऑफ इमिग्रेशन अंतर्गत ही सुविधा दिली जाईल. त्यामुळेच त्याला पॅरोल इन प्लेस ग्रीन कार्ड असं दुसरे नाव देण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
५ लाखाहून अधिक भारतीयांना फायदा, फक्त ही अट
माहितीनुसार, अमेरिकन सरकारच्या या धोरणामुळे अमेरिकेत विना दस्तावेज राहणाऱ्या कमीत कमी ५ लाखाहून अधिक भारतीयांना त्याचा फायदा होणार आहे. पती असो वा पत्नी ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी ग्रीन कार्ड अथवा दस्तावेज नाही, ज्यांनी अमेरिकन नागरिकाशी लग्न केले आहे अशा लोकांचा यात समावेश आहे. १७ जूनपर्यंत जे लोक अमेरिकेत १० वर्षाहून अधिक काळ राहत आहेत त्यांनाच याचा फायदा होईल.
ग्रीन कार्डसाठी अमेरिकेत भारतीय व्हेटिंगवर
जवळपास २.२ कोटी लोक अमेरिकेत असे आहेत ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड नाही.
सध्याच्या घडीला १२ लाख भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत आहेत.
अमेरिकेत दरवर्षी २.२६ लाख कुटुंब आधारित ग्रीन कार्ड जारी होतात
१.४० लाख लोकांना रोजगारासाठी ग्रीन कार्ड दिलं जातं
सरासरी ९८०० भारतीयांना दरवर्षी ग्रीन कार्ड मिळते
किती दिवसाठी मिळणार वर्क परमिट?
पॅरोल इन प्लेस धोरणानुसार, १० वर्षाहून अधिक काळ विना दस्तावेज अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना देशात कायदेशीर कामासाठी मंजुरी मिळेल. पात्र असणाऱ्या लोकांना निवासासाठी अर्ज करायला ३ वर्षाची मुदत असेल आणि ते ३ वर्ष वर्क परमिटसाठी पात्र ठरतील.
दरम्यान, अमेरिकेत मोठ्या संख्येनं भारतीय राहतात. त्यातील बहुतांश मतदार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात ग्रीन कार्डचा मुद्दा चर्चेत आहे. त्यात भारतीय मतदारांना आकर्षिक करण्यासाठी अशाप्रकारची घोषणा करण्यात येऊ शकते. जर अमेरिकन सरकारनं ही स्कीम लागू केली तर त्यात २१ वर्षाखालील किमान ५० हजार युवकांना याचा फायदा मिळू शकतो. ज्यांच्या आई वडिलांपैकी कुणीही एक अमेरिकन नागरिक असेल.
वेगळे राहणाऱ्या पती-पत्नीला एकत्र आणणार
पॅरोल इन प्लेसमुळे भारतीयांना त्यांच्या कुटुंबासोबत राहता येणार आहे ज्यांचे पती किंवा पत्नी गैर अमेरिकन आहेत. विना दस्तावेजामुळे दिर्घ काळापासून पती-पत्नी वेगळे राहत होते. आता पॅरोल इन प्लेसमुळे पती-पत्नीला एकत्रित राहता येणार आहे.