यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 07:34 AM2018-04-04T07:34:06+5:302018-04-04T08:54:19+5:30

कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

America : california youtube headquarters shooting woman shooter shot dead  | यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार

यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार

Next

वॉशिंग्टन -  कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका बंदुकधारी महिलेनं मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार केला व यानंतर स्वतःवरच  गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी लोकांनी घाबरुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळापळ करण्यास सुरुवात केली. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यु-ट्यूब मुख्यालयात गोळीबार करणारी महिला इमारतीत मृतावस्थेत आढळून आली. गोळीबार केल्यानंतर तिनं स्वतःवर गोळी झाडली. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अॅम्ब्युलन्स दाखल झाली. पोलिसांनी लोकांना घटनास्थळी न येण्याचं आवाहन केले. यानंतर काही काळ यु-ट्युबचे मुख्यालयदेखील बंद करण्यात आले व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, यु-ट्यूबच्या मुख्यालयात करण्यात आलेला गोळीबार घरगुती वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमी झालेल्या चार जणांपैकी एका व्यक्तीला बंदुकधारी महिला ओळखत होती. CBCS न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, जखमी झालेला व्यक्ती हा संशयित हल्लेखोर महिलेचा प्रियकर असल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी झालेल्या दोन महिलांपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.  

दुसरीकडे,  गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी युट्यूब मुख्यालयावर झालेल्या गोळीबाराबाबत दु:ख व्यक्त केले

 




 




 




 

 

Web Title: America : california youtube headquarters shooting woman shooter shot dead 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.