ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 मुळे कहर! अमेरिकेतील 13 राज्यात संक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 08:32 PM2022-04-27T20:32:12+5:302022-04-27T20:32:53+5:30
Omicron : आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.
न्यूयॉर्क: कोरोनाचे (Corona) सर्वात मोठे संसर्गजन्य व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या (Omicron variant) नवीन म्यूटेंटने जगभरातील शास्त्रज्ञांना चिंतेत टाकले आहे. न्यूयॉर्क (New York) परिसरातील 56 टक्के रुग्णांमध्ये हा नवीन म्यूटेंट आढळून आला आहे. हा कोरोनाचा पहिला व्हेरिएंट ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. परंतु अमेरिकन शास्त्रज्ञांनी या म्यूटेंटला सर्वात वेगाने पसरणारे संक्रमण म्हटले आहे.
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिव्हेंशनद्वारे मंगळवारी रिपोर्ट केलेल्या आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 चा संसर्ग आतापर्यंत इतर 13 देशांमध्ये पोहोचला आहे. हा आधीच्या अतिसंसर्गजन्य 'स्टेल्थ ओमायक्रॉन'चा वंशज आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये या म्यूटेंटने फार कमी वेळात आपले स्थान निर्माण केले आहे. या व्हेरिएंटची बहुतांश प्रकरणे अमेरिकेतच आढळून आली आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
याचबरोबर, BA.2.12.1 च्या वाढत्या पातळीसह प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. जसे की सेंट्रल न्यूयॉर्क, असे न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थचे एली रोसेनबर्ग यांचे मत आहे. दरम्यान, जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक 82 गरीब देशांमध्ये फक्त 70 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट काही देशांमध्ये पूर्ण झाले आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अनेक देश 20 टक्क्यांच्या खाली आहेत. याउलट, जगातील दोन तृतीयांश श्रीमंत देशांमध्ये 70 टक्के लस (अमेरिकेत 66 टक्के) लसीकरण झाले आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कमला हॅरिस यांचाचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन गेल्या काही दिवसांपासून कमला हॅरिसच्या संपर्कात आलेले नाहीत, असे व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी केले आहे.
वर्ल्डोमीटरच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत फ्रान्समध्ये 58,000 आणि अमेरिकेत 12,000 प्रकरणे आढळून आली आहेत. दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक 64,725 नवीन रुग्ण आढळले आहेत. मृतांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर फ्रान्समध्ये 40 आणि अमेरिकेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.