संकटं संपता संपेना! कोरोना, डेल्टानंतर आता RS व्हायरसचे थैमान; नवजात बाळांनाही विळखा; जाणून घ्या, लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:59 PM2021-08-03T15:59:44+5:302021-08-03T16:03:15+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे. नवजात बाळांनाही या व्हायरसने विळखा घातल्याची माहिती मिळत आहे. कोरोना, डेल्टा व्हेरिएंटनंतर आता अमेरिकेत RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस आढळून आला आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बाळापासून ते 17 वर्षांच्या मुलांपर्यंत अनेकजण या व्हायरसच्या विळख्यात सापडत आहेत.
अमेरिकेत आता डेल्टासोबतच RS व्हायरसबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला तर काय करायचं? हा प्रश्न आता तज्ज्ञांना सतावू लागला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेत न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये जून महिन्यापासून अमेरिकेत RSV बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. जुलै महिन्यात या व्हायरस बाधित रुग्णांचा दर खूपच जास्त होता.
CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात निष्काळजीपणा ठरू शकतो घातक; वेळीच व्हा सावध#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#DeltaVarianthttps://t.co/46wAK4Yhs3
— Lokmat (@MiLOKMAT) August 3, 2021
RSV ची लागण झाल्यावर नाक वाहणं, खोकला येणं, शिंका येणं आणि ताप यासारखी लक्षणं दिसू शकतात. ह्युस्टनमधील टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ हीदर हक याबाबत एक ट्विट केलं आहे. "गेल्या काही महिन्यांपासून शून्य ते अगदी नवजात बालकांना कोरोना व्हायरसची लागण होतं आहे. नवजात बालकं, लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे" असं हीदर हक यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus Live Updates : बापरे! महिलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/MfY42c9yo2
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021
न्यूयॉर्क टाईम्सच्या आकडेवारीनुसार, मागील काही दिवसांपासून अमेरिकेत नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. गेल्या दोन आठवड्यांत 148 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. तर, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळे कोरोना रुग्णांचा आलेख वाढला असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावल्याने ही वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा नवा व्हेरिएंट अत्यंत घातक; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा#Corona#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronavirusPandemic#CoronaUpdates#DeltaVarianthttps://t.co/WRviyicMNu
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2021