धक्कादायक! प्रमोशन न दिल्याने कर्मचारी संतापला, बॉससह पूर्ण कुटुंबाचा काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:32 PM2022-09-16T13:32:44+5:302022-09-16T13:33:46+5:30

प्रमोशन न दिल्यामुळे कर्मचाऱ्याने बॉससह त्याची पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

America Crime News: employee killed boss and his family after boss rejected his promotion in america | धक्कादायक! प्रमोशन न दिल्याने कर्मचारी संतापला, बॉससह पूर्ण कुटुंबाचा काटा काढला

धक्कादायक! प्रमोशन न दिल्याने कर्मचारी संतापला, बॉससह पूर्ण कुटुंबाचा काटा काढला

Next

पगारवाढ आणि बढती, या दोन गोष्टी नोकरी करणाऱ्यांसाठी खूप महत्वाच्या असतात. कधी-कधी अपेक्षेप्रमाणे पगारवाढ किंवा प्रमोशन मिळाले नाही, तर कर्मचारी नाराज होऊन दुसऱ्या कंपनीत शोधतात. पण, एका व्यक्तीने प्रमोशन न मिळाल्यामुळे, एक धक्कादायक पाऊल उचलले, ज्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. 

डोक्यात घातल्या गोळ्या
ही घटना अमेरिकेत घडली असून, फांग लु (58, Fang Lu) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. प्रमोशन न मिळाल्याने फांग लु खुनी बनला. मूळ चीनचा रहिवासी असलेला फांग लु अमेरिकेतील ऑयलफील्ड सर्विसेज कंपनी Schlumberger मध्ये काम करायचा. प्रमोशन न मिळाल्याने नाराज झालेल्या फांग लुने त्याच्या बॉससह कुटुंबातील 4 लोकांची डोक्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. 

शुल्लक करणावरुन हत्या
नुकताच फांग लु चीनवरुन अमेरिकेत आल्यावर, त्याला 8 वर्षे जुन्या हत्याकांडात अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने हत्येचे कारण सांगितले. प्रमोशन न देणे आणि सर्वांसमोर रागवल्यामुळे आरोपीने हे पाऊल उचलले. हत्येमागचे हे कारण ऐकून पोलिसही अवाक् झाले. परंतू, कोर्टात हजर केल्यानंतर फांग लु जजसमोर सतत आपली साक्ष फिरवतोय.

कोणाची हत्या केली?
2014 मध्ये आरोपी फांग लुचा माओये, त्यांची पत्नी मेइक्सी, 9 वर्षीय मुलगी आणि 7 मुलगा घरातील वेगवेगळ्या रुममध्ये मृत आढळले होते. त्या सर्वांच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. या हत्येचा आरोप फांग लुवर होता, पण घटनेनंतर तो चीनला पळून गेला. अखेर आठ वर्षानंतर तो अमेरिकेत परतल्यानंतर सॅन फ्रांसिस्कोमधून त्याला अटक करण्यात आले. 
 

Web Title: America Crime News: employee killed boss and his family after boss rejected his promotion in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.