खून करू नये म्हणून अमेरिकेत गुन्हेगारांनाच दिले जातात १००० डॉलर्स

By admin | Published: March 30, 2016 03:18 PM2016-03-30T15:18:12+5:302016-03-30T15:31:33+5:30

लोकांचा खून करू नये यासाठी कॅलिफोर्नियातील रिचमोंड शहरात गुन्हेगारांना महिन्याला ३०० ते १००० डॉलर्स दिले जातात.

In America, the criminals are given 1000 dollars to avoid murder | खून करू नये म्हणून अमेरिकेत गुन्हेगारांनाच दिले जातात १००० डॉलर्स

खून करू नये म्हणून अमेरिकेत गुन्हेगारांनाच दिले जातात १००० डॉलर्स

Next
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि, ३० - शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून कॅलिफोर्नियात गुन्हेगारांनाच पैसे दिले जात असल्याची अनोखी योजना समोर आली आहे. गुन्हेगारांनी लोकांचा खून करू नये यासाठी कॅलिफोर्नियातील रिचमोंड शहरातील गुन्हेगारांना महिन्याला ३०० ते १००० डॉलर दिले जातात. 
'ऑफीस ऑफ नेबरहूड सेफ्टी' तर्फे हा अनोखा कार्यक्रम राबवण्यात येत असून तेथे माजी गुन्हेगार वा दोषी व्यक्ती १३ ते २५ वयोगटातील तरूणांना (गुनेह्गारांना) हेरून त्यांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळवणं वा नोकरी मिळवणं यासाठी अशी काही ध्येय आखून दिली जातात. जर ते तरूण सहा महिने वा अधिक काळ कार्यरत राहिले तर त्यांना त्यांच्या सहभागप्रमाणे दर महिन्याला ३०० ते १००० डॉलर्स दिले जातात. 
ही अनोखी योजना डेव्हॉन बॉगन यांची, एका पेड बिझिनेस स्कूल फेलोशिपबद्दल वाचल्यानंतर २००७ साली ते ही योजना घेऊन आले. २०१० साली त्यांनी काही माजी गुन्हेगारांना एकत्र बोलावून २१ जणांच्या ग्रुपचला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली. गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेला हा अनोखा कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला असून ८८ तरूणांपैकी ८४ तरूण यशस्वीरित्या जीवन जगत आहेत. तसेच त्यापैकी ४ते ५ तरूण पुन्हा गुन्हेगारीकडे वळले नाहीत, ना त्यांना पोलिसांच्या गोळ्यांचा सामना करावा लागला...!
ही योजना यशस्वी ठरल्यानंतर बॉगन आणखी एक नवी कल्पना घेऊन आले आहेत, ती म्हणजे कुठेतरी फिरून येण्यासाठी त्या गुन्हेगारांना १० हजार डॉलर्सची रक्कम द्यायची. मात्र त्यासाठी एकच अट आहे की त्या गुन्हेगारांनी एकट्याने न फिरता अशा व्यक्तीला सोबत घेऊन जायचे जिला त्यांनी मारायचा प्रयत्न केला असेल.
कॅलिफोर्नियातील रिचमोंड ही योजना इतकी यशस्वी ठरली आहे की आता अशीच योजना वॉशिंग्टन डीसीमध्ये राबवण्याचा विचार होत आहे. 

Web Title: In America, the criminals are given 1000 dollars to avoid murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.