CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:27 PM2021-09-04T15:27:43+5:302021-09-04T15:34:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

america delta variants one death every 55 seconds 111 people infected with corona every 60 seconds | CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण

googlenewsNext

कोरोनान संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केवा आहे. तर आतापर्यंत कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतची सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. 

अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 6.62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात देखील जागा शिल्लक नसल्याचं चित्र आहे. अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा परिणाम पाहायला मिळत आहे. वेरमोंट, टेक्सास कंसास, अलास्का, ऊटाह. नेवादा, ओरेगन, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये 2020 च्या तुलनेत आता मृतांचा आकडा वाढला आहे. फक्त ऑगस्ट महिन्यांत कोरोनाचे 42 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

कोरोनाचा विस्फोट! प्रगत अमेरिकाही हतबल, ऑक्सिजनची मोठी कमतरता; मुलांमध्ये संसर्गाचा धोका

कोरोना मृतांची संख्या ही जुलैमधील संख्येच्या तुलनेत आता तीन पटींनी वाढली आहे. अमेरिकेत ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासू लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील रुग्णालयात बेड आणि स्टाफची कमतरता होती. मात्र आता ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि लुईसियानासारख्या राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. डोना क्रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ऑक्सिजन टँक हे 90 टक्के भरले जातात. जेव्हा टँकमध्ये 40 ते 50 टक्के ऑक्सिजन शिल्लक असतो तेव्हा तो टँक पुन्हा भरला जातो. मात्र आता 10 ते 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक राहिल्यावर तो भरण्यात येत आहे. 

कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर

अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रांतात सध्या 17 हजारांहून अधिक रुग्ण भरती आहेत. अमेरिकेतील वाढत्या रुग्णसंख्येने रेकॉर्ड केला आहे. मृतांचा आकडा तर सातत्याने वाढत आहे. यासाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सहा लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

Web Title: america delta variants one death every 55 seconds 111 people infected with corona every 60 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.