"मला माझे..."; धडाधड गोळीबार सुरू असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांना जीवापेक्षा महत्वाची वाटली 'ही' एक गोष्ट! बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 06:03 PM2024-07-14T18:03:29+5:302024-07-14T18:06:15+5:30
Donald Trump Firing : ...पण ट्रम्प जीवघेणा हल्ला होऊनही निश्चिंत दिसले. जेव्हा सीक्रेट सर्व्हिस एजन्ट ट्रम्प यांना सावरत होते, तेव्हा ट्रम्प यांना आपल्या जीवापेक्षाही एक गोष्ट अधिक म्हत्वाची वाटली. माहीत आहे काय?
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प झालेल्या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या कानाला गोळी लागली आहे. मात्र, गोळी लागूनही ते काही वेळातच आपल्या पायावर उभेही राहिले. घटना घडली तेव्हा ट्रम्प यांचे समर्थक प्रचंड भयभीत झाले होते. पण ट्रम्प जीवघेणा हल्ला होऊनही निश्चिंत दिसले. जेव्हा सीक्रेट सर्व्हिस एजन्ट ट्रम्प यांना सावरत होते, तेव्हा ट्रम्प यांना आपल्या जीवापेक्षाही एक गोष्ट अधिक म्हत्वाची वाटली. माहीत आहे काय? त्यांचे 'बूट'. या गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.
बघा व्हिडिओ -
आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की, एवढा भयंकर आणि जीवघेणा हल्ला झालेला असतानाही ट्रम्प आपल्या बुटांसंदर्भात बोलत आहेत. गोळीबार थांबल्यानंतर आणि हल्लेखोर ठार झाल्यानंतर, काही सैनिक ट्रम्प यांना पुढे चालण्यास सांगत आहेत. यावेळी ट्रम्प त्यांना, 'मला माझे शूज घेऊ द्या,' असे म्हणताना दिसत आहेत. शूज घातल्यानंतर ट्रम्प आपल्या समर्थांकांना हाताची मूठ दाखवत 'लढा... लढा...' म्हणाले. यानंतर समर्थकांनीही घोषणा दिल्या आणि ट्रम्प खरा योद्धा असल्याचे म्हणाले.
“Let me get my shoes” pic.twitter.com/fPTLz8b4fV
— Mike (@Doranimated) July 14, 2024
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचारसभेदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. हल्ला होताच यूएस सीक्रेट सर्व्हीस एजन्ट्स सावध झाले आणि त्यांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच प्रत्युत्तरात कारवाई करत हल्लेखोरालाही जागीच ठार केले. या हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स (Thomas Matthew Crooks) असे होते. तो २० वर्षांचा होता.
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ... -
#WATCH | Gunfire at Donald Trump's rally in Butler, Pennsylvania (USA). He was escorted to a vehicle by the US Secret Service
— ANI (@ANI) July 13, 2024
"The former President is safe and further information will be released when available' says the US Secret Service.
(Source - Reuters) pic.twitter.com/289Z7ZzxpX
व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावरून झाली फायरिंग -
डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला. बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्नायपरला निशाणा साधण्यात कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता.