निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 24, 2020 04:47 PM2020-09-24T16:47:31+5:302020-09-24T16:56:02+5:30

यावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो,असे आपल्याला वाटते. कारण पोस्टल मतदानावर आपल्याला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हणाले आहे.

America election donald trump says will not commit to peaceful transfer of power | निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

Next
ठळक मुद्देयावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो - ट्रम्पकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अधिकांश राज्ये मेलच्या सहाय्याने मतदान करून घेण्याच्या विचारात आहेत. मतपत्रीकांपासून मुक्ती मिळवा, मोठी शांतता मिळेल. सत्तेचे कसल्याही प्रकारचे हस्तांतरण होणार नाही - ट्रम्प

वॉशिग्टन - राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता हस्तांतर करणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, निवडणूक निकालासंदर्भात बोलताना, पुढे काय होते, याची वाट पाहावी लागेल, असेही ट्रम्प म्हणाले, ते बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे.

यावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो,असे आपल्याला वाटते. कारण पोस्टल मतदानावर आपल्याला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हणाले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अधिकांश राज्ये मेलच्या सहाय्याने मतदान करून घेण्याच्या विचारात आहेत. 

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही -
पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प यांना विचारण्यात आले, की  विरोधी डेमोक्रॅट जो बिडेन यांच्याकडून त्यांचा पराभव झाला अथवा निवडणूक ड्रा झाली, तर ते सत्तेचे शाततापूर्वक हस्तांतर करतील? यावर ट्रम्प म्हणाले, याची कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही. मी बॅलेटसंदर्भात सातत्याने तक्रार करत आहे. एका रिपब्लिकनने तर बॅलेटला डिजास्टर म्हणूनही संबोधले आहे. ट्रम्प म्हणाले, सध्यस्थितीत मेल-इन मतपत्रीका येण्याची आशा आहे. मतपत्रीकांपासून मुक्ती मिळवा, मोठी शांतता मिळेल. सत्तेचे कसल्याही प्रकारचे हस्तांतरण होणार नाही. 

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

ट्रम्प यांनी 2016मध्येही डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात निवडणूक निकाल मान्य करण्याचा शब्द देण्यास नकार दिला होता. यावेळी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचेही हिलरी म्हणाल्या होत्या. नंतर ट्रम्प विजयी तर झाले. मात्र, पॉप्युलर व्होटिंगमध्ये त्यांचा 30 लाख मतांनी पराभव झाला होता. 

कोरोना महामारीचा ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता -
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता केवळ 41 दिवसच शिल्लक आहेत. आणि आतापर्यंत आलेल्या राष्ट्रीय ओपिनयन पोलमध्ये ट्रम्प डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बिडेन यांच्या मागे आहेत. कोरोना व्हायरस महामारीचा ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतच कोरोनाने आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत. 

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

शांततापूर्वक सत्तेचे हस्तांतर, हा लोकशाहीचा मूल मंत्र -
ट्रम्प यांच्या वक्यव्यानंतर, त्यांच्याच पक्षाचे सिनेटर मिट रोमन यांनी ट्विट करत, "शांततापूर्वक सत्तेचे हस्तांतर, हा लोकशाहीचा मूल मंत्र आहे. या शिवाय तर आपला देश बेलारूस होईल. ट्रम्प यांचे विधान स्वीकारार्ह नाही," असे म्हटले आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

 

Web Title: America election donald trump says will not commit to peaceful transfer of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.