१२८ खोल्या, २० एकर जागा, १६ कोटी डॉलर्स किंमत; पाहा कसं असेल ट्रम्प यांचं नवं घर

By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 02:01 PM2021-01-21T14:01:34+5:302021-01-21T14:04:41+5:30

निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांना सोडावं लागलं व्हाईट हाऊस

america former president Donald Trump to make Mar a Lago estate in florida his permanent home after leaving White House palm beac | १२८ खोल्या, २० एकर जागा, १६ कोटी डॉलर्स किंमत; पाहा कसं असेल ट्रम्प यांचं नवं घर

फोटो सौजन्य - रॉयटर्स

Next
ठळक मुद्देनिवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांना सोडावं लागलं व्हाईट हाऊस१९८५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी खरेदी केलं होतं हे घर

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागलं. ट्रम्प हे आता फ्लोरिडामधील पाम बीचनजीक असलेल्या आपल्या मार-ए-लागो इस्टेटला आपलं निवासस्थान बनवणार आहेत. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसमधून ट्रम्प यांच्या अखेरच्या कामाकाजाच्या दिवशी निघालेले ट्रक हे त्यांच्या मार-ए-लागो या निवासस्थानी पोहोचल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातही मार-ए-लागो या ठिकाणी आपला बराचसा वेळ घालवला आहे. याला ट्रम्प यांचं विंटर हाऊस म्हणूनही संबोधलं जायचं. ७४ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८५ मध्ये एक कोटी डॉलर्सला हे घर खरेदी केलं होतं. तसंच त्यानंतर त्यांनी ते एका खासगी क्लबमध्ये बदललं. गेल्या चार वर्षांपासून हे त्यांचं विंटर हाऊस म्हणून ओळखलं जात होतं. हे घर १९२७ मध्ये उभारण्यात आलं होतं. फोर्ब्सच्या माहितीनुसार रिनोवेशन आणि हे घर ज्या ठिकाणी आहे त्यानुसार मार-ए लागोची किंमत जवळपास १६ कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास ११६६.७३ कोटी रूपये इतकी आहे.

जवळपास २० एकरमध्ये परसलेल्या या घरात १२८ खोल्या आहेत. तसंच घरातून मनमोहक असा अटलांटिक महासागराचं दृश्यही दिसतं. दरम्यान, क्लबचं सदस्यत्व घेणाऱ्या लोकांसाठी ही जागा खुली राहणार आहे. यामध्ये २० हजार चौरस फुटांची बॉलरूम, ५ क्ले टेनिस कोर्ट आणि एक वॉटरफ्रन्ट पूल सामिल आहे. या ठिकाणी ट्रम्प यांचे प्रायव्हेट कॉर्टर्सदेखील आहेत. मार-ए-लोगो फ्लोरिडातील दुसरं मोठं मेन्शन समजलं जातं.

दरम्यान, ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदावर नसले तरी त्यांना सिक्युरिटी आणि ट्रान्सपोर्टच्या खर्चासाठी १० लाख डॉलर्स देण्यात येणार आहे. तर याव्यतिरिक्त त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना पाच लाख डॉलर्स देण्यात येतील. 

Web Title: america former president Donald Trump to make Mar a Lago estate in florida his permanent home after leaving White House palm beac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.