Omicron Variant: बलाढ्य अमेरिकेला ओमायक्रॉनने पछाडले; नवे रुग्ण दीड लाखांवर, ७३ टक्के बाधित नव्या विषाणूचे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:10 AM2021-12-22T10:10:49+5:302021-12-22T10:12:20+5:30

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने अमेरिका सरकारची चिंता वाढली आहे.

america found omicron variant new patients over 1 lakh daily | Omicron Variant: बलाढ्य अमेरिकेला ओमायक्रॉनने पछाडले; नवे रुग्ण दीड लाखांवर, ७३ टक्के बाधित नव्या विषाणूचे

Omicron Variant: बलाढ्य अमेरिकेला ओमायक्रॉनने पछाडले; नवे रुग्ण दीड लाखांवर, ७३ टक्के बाधित नव्या विषाणूचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क: अमेरिकेतही आता ओमायक्रॉन बस्तान बसवू लागला आहे. अलीकडेच अमेरिकेत नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये ७३ टक्के बाधित ओमायक्रॉनचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाताळात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी अमेरिकेत जोर धरू लागली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने अमेरिका सरकारची चिंता वाढली आहे.

बाधितांची संख्या या ठिकाणी अधिक

- वॉशिंग्टन, ओरेगॉन, इडाहो आणि अलास्का

- याशिवाय वायव्येकडील राज्ये, दक्षिण आणि मध्य पश्चिमेकडील राज्यांमध्येही ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे.

- संपूर्ण अमेरिकेत गेल्या आठवड्यात साडेसहा लाखांहून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे.

विविध ठिकाणी निर्बंध

- ओमायक्रॉन बाधितांची संख्या लक्षात घेता, अमेरिकेतील विविध शहरांमध्ये निर्बंध लागू 
केले जाऊ लागले आहेत.

- निर्बंध लावण्यात येत असले तरी अध्यक्ष बायडेन संपूर्ण अमेरिकेत लॉकडाऊन जारी करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते.

न्यूयॉर्कमध्ये रोजची रुग्णसंख्या दुप्पट

आधी : ३२००
आता : ७२००

रोज जवळपास दीड लाख रुग्ण

२० डिसेंबर     १,४३,५३०
१९ डिसेंबर     १,३०,८१६
१८ डिसेंबर     १,५२,२५६
१७ डिसेंबर     १,६७,११९
१६ डिसेंबर     १,५८,८९३
१५ डिसेंबर     १,४०,८९१
 

Web Title: america found omicron variant new patients over 1 lakh daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.