अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:40 AM2024-10-10T11:40:17+5:302024-10-10T11:41:02+5:30

" गेल्या ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत अमेरिकेने मध्य पूर्वेतील संघर्षावर $22.76 अब्ज (रु. 18,47,15,19,00,000) एवढा खर्च केल्याचे समोर आले आहे."

America gave Israel rs 18,47,15,19,00,000 worth of weapons in one year Looking at the list, you will be shocked | अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल

अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल

गेल्या वर्षी इस्रायल आणि हमास युद्ध पेटले. यानंतर लगेचच अमेरिकेने तेल अवीवला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पाठवायला सुरुवात केली. याशिवाय, बायडेन प्रशासनाने मध्यपूर्वेतील आपल्या ठिकानांवर कॅरिअर स्ट्राइक ग्रुप, लढाऊ विमानांचे स्क्वाड्रन्स, एअर डिफेन्स सिस्टिम आणि सैन्य वाढवले. यानंतर आता, एका वर्षानंतर, ब्राउन युनिव्हर्सिटीच्या कॉस्ट ऑफ वॉर प्रोजेक्टचा एक नवा अहवालात समोर आला आहे. यात, गेल्या ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत अमेरिकेने मध्य पूर्वेतील संघर्षावर $22.76 अब्ज (रु. 18,47,15,19,00,000) एवढा खर्च केल्याचे समोर आले आहे.

इस्रायलला एकाच वर्षात केली 22.76 बिलियन डॉलरची मदत - 
या मदतीत 17.9 अब्ज डॉलर इस्रायलला सुरक्षा सहाय्याता म्हणून देण्यात आले आहेत. तर4.86 अब्ज डॉलर संपूर्ण प्रदेशात अमेरिकेची तैनाती वाढवण्यासाठी खर्च करण्यात आले. या खर्चामध्ये येमेनच्या हुथींविरुद्ध अमेरिकेच्या लष्करी मोहिमेच्या खर्चाचाही समावेश आहे. विद्यापीठानुसार, 7 ऑक्टोबर, 2023 पासून 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत या संकटासंदर्भातील इतर खर्चाचा समावेश नाही. जसे की, लाल समुद्रात हुतींच्या आंशिक नाकेबंदीमुळे जागतिक शिपिंगच्या खर्चात झालेली वाढ.

अमेरिकेने इस्रायलला केली सर्वाधिक मदत -
संबंधित अहवालानुसार, अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या शस्त्रांस्त्रांमध्ये जवळपास 57,000 तोफगोळे, तोफांसाठी 36,000 राउंड दारू-गोळा, 20,000 M4A1 रायफल्स, 14,000 अँटी-टँक मिसाइल्स, 8,700 MK 82 500 पाउंड बॉम्बचा समावेश आहे.

एयर डिफेंस सिस्टिमसाठीही कोट्यवधी डॉलर -
याशिवाय अमेरिकेने इस्रायलला, आयर्न डोम आणि डेव्हिड स्लिंग एअर डिफेन्स सिस्टमसाठी 4 अब्ज डॉलर आणि आयर्न बीम लेझर एअर डिफेन्स सिस्टमसाठी 1.2 अब्ज डॉलरची मदत केली आहे. एवढेच नाही, तर अमेरिकन शस्त्रागार पुन्हा भरण्यासाठीही 4.4 अब्ज डॉलर दिले आहेत.

या घातक शस्त्रास्त्रांनी भरली आहेत गोदामं - 
अमेरिकेच्या मदतीमध्ये 4,127,000 किलोग्रॅम जेपी-8 जेट इंधन, 14,100 एमके 84 अनगाइड 2,000 बॉम्ब, 3,000 जॉइंट डायरेक्ट अटॅक म्युनिशन डंब-टू-स्मार्ट बॉम्ब ट्रान्सफॉर्मर किट, 3,000 हेलफायर मिसाइल, 2,600 250-पाउंड जीबीयू-39 छोट्या आकाराचे बॉम्ब, 1,800 एम141 बंकर बस्टर बॉम्ब, 3,500 नाइट व्हिजन डिव्हाइस, 200 स्विचब्लेड ड्रोन, 100+ स्कायडियो एक्स ड्रोन आणि 75 ज्वाइंट लाइट टॅक्टिकल वाहनांचाही समावेश आहे.

Web Title: America gave Israel rs 18,47,15,19,00,000 worth of weapons in one year Looking at the list, you will be shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.