लपलेल्या हक्कानीला मारण्यासाठी अनेकदा ड्रोन हल्ले; परंतू खुलेआम दिसताच अमेरिका गप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:56 AM2021-08-23T05:56:24+5:302021-08-23T05:56:43+5:30

काबूलमध्ये फिरताना दिसला हक्कानी, ३७ कोटी रुपयांचे आहे बक्षीस . खलील हक्कानीने पाकिस्तानातून दहशतवादाचे जाळे विणले आहे. त्याने तालिबानला कायम साथ दिली आहे.

America helpless: The superpower could not touch Haqqani | लपलेल्या हक्कानीला मारण्यासाठी अनेकदा ड्रोन हल्ले; परंतू खुलेआम दिसताच अमेरिका गप्प

लपलेल्या हक्कानीला मारण्यासाठी अनेकदा ड्रोन हल्ले; परंतू खुलेआम दिसताच अमेरिका गप्प

Next

काबूल : अफगाणिस्तानतालिबान्यांच्या ताब्यात गेल्यानंतर काही मोस्ट वाँटेड दहशतवादी बिळातून बाहेर निघू लागले आहेत. अमेरिकेला हवा असलेला दहशतवादी खलील हक्कानी हा काबूलमध्ये नारेबाजी करताना दिसून आला. खलील हक्कानीवर अमेरिकेने ३७ कोटी रुपयांचे बक्षीसही ठेवले आहे. असा हा हक्कानी केवळ काही किलोमीटर अंतरावर होता. मात्र, अमेरिकन सैन्याला कोणतीही कारवाई करता आली नाही. 

खलील हक्कानीने पाकिस्तानातून दहशतवादाचे जाळे विणले आहे. त्याने तालिबानला कायम साथ दिली आहे. अमेरिकेने अनेकदा ड्रोन हल्ल्यांमधून हक्कानीच्या अड्ड्यांवर हल्ले केले आहेत. आज अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येताच हक्कानी बाहेर मोकाट फिरताना दिसला. काबूलमधील सर्वात मोठ्या मशिदीच्या इमामांसोबत खलील हक्कानीने चर्चा केली. त्यानंतर बाहेर येऊन त्याने काबूलच्या रस्त्यांवर नारेबाजी केली. या हक्कानीला अमेरिकेने २०११ मध्ये जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. त्याने अल-कायदासोबतही काम केले आहे. तो आता तालिबानची भाषा बोलू लागला आहे. तो म्हणाला की, तालिबान देशाला सुरक्षा देईल. महिला आणि पत्रकारांना घाबरण्याची गरज नाही. कोणासोबतही भेदभाव होणार नाही. 

सशस्त्र सुरक्षारक्षकांचा हक्कानीला गराडा
nहक्कानीच्या सुरक्षेमध्ये 
तालिबानी सैनिकही होते. हेल्मेट आणि नाइट व्हीजन गॉगल्ससह अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याकडे होती. 
nअमेरिकन सैन्यापासून तो अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होता. मात्र, त्याला हातदेखील लावता आला नाही. 

‘२० वर्षांमध्ये कमावलेले सर्व काही संपले’
nअफगाणिस्तानचे खासदार नरेंद्रसिंग खालसा हेदेखील या नागरिकांमध्ये होते. एका गुरुद्वारामध्ये अजूनही २८० शीख बांधव अडकले असून त्यांनाही मदत करण्याची विनंती खालसा यांनी भारत सरकारकडे केली आहे.
nअफगाणिस्तानमधून भारतात आल्यानंतर शीख खासदार नरेंद्र सिंह खालसा यांना अश्रू अनावर झाले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. 
nते म्हणाले की, मला तिथली परिस्थिती पाहून रडायला येत आहे. ज्या 
अफगाणिस्तानात आम्ही अनेक पिढ्यांपासून राहत आहोत, तिथे अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितली नव्हती. आता परिस्थिती खूपच गंभीर आहे. सर्व संपले असून आता शून्य झाले आहे, असे नरेंद्र सिंह खालसा यांनी सांगितले.

Web Title: America helpless: The superpower could not touch Haqqani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.