पत्नीसोबत कडाक्याचं भांडण; संतापलेल्या पतीनं मुलीलाच टाकलं वॉशिंग मशीनमध्ये अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:39 PM2021-09-15T13:39:21+5:302021-09-15T13:40:39+5:30

या भांडणावेळी, प्रचंड संतापलेल्या मायकलने आपल्या मुलिला उचलून वॉशिंग मशिनमध्ये ठेवले आणि मशिनचे बटन चालू केले.

America Husband angry on wife put daughter in washing machine | पत्नीसोबत कडाक्याचं भांडण; संतापलेल्या पतीनं मुलीलाच टाकलं वॉशिंग मशीनमध्ये अन्...

पत्नीसोबत कडाक्याचं भांडण; संतापलेल्या पतीनं मुलीलाच टाकलं वॉशिंग मशीनमध्ये अन्...

Next

पती-पत्नी यांच्यातील भांडणांच्या घटना सातत्याने समोर येत असतात. कधीकधी हा वाद एवढा टोकाला पोहोचतो, की ते एकमेकांचा जीव घ्यायला आणि जीव द्यायलाही पुढे मागे पाहत नाहीत. काहीशी अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे. येथे एक माणून पत्नीशी भांडताना एवढा संतापला, की त्याने आपल्या दोन वर्षांच्या निष्पाप मुलीवरच त्याचा राग काढला. त्याने मुलीला उचलून थेट वॉशिंग मशीनमध्येच टाकले आणि मशीनचे बटन सुरू केले. 

पायलट BF नं विमानातच केली अशी अनाउंसमेंट, की लाजून गर्लफ्रेंडचं झालं पाणी-पाणी

ही घटना अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथे घडली. 'न्यूयॉर्क पोस्ट'मधील एका वृत्तानुसार, संबंधित व्यक्तीचे नाव मायकल, असे आहे. हे दोघेही मूळचे दुसर्‍या शहरातील आहेत. मात्र नोकरीमुळे ते न्यू हॅम्पशायरमध्ये राहतात. मायकल आणि  त्याच्या पत्नीचे भांडण रोजचेच असल्याचे समजते.  मात्र, या भांडणावेळी, प्रचंड संतापलेल्या मायकलने आपल्या मुलिला उचलून वॉशिंग मशिनमध्ये ठेवले आणि मशिनचे बटन चालू केले. त्याच्या पत्नीने हा संपूर्ण प्रकार पाहिला. यानंतर तिने धावत जाऊन वॉशिंग मशीन बंद केले. सुदैवाने संबंधित चिमुकलीचा जीव वाचला. 

यानंतर संबंधित मुलीला, तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आहे. डॉक्टरांनी सांगितले की मुलीच्या आईने मशीन वेळीच बंद केले नसते, तर मुलीचा जीवही जाण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहचले आणि घटनेबाबत सर्वांची चौकशी केली. यानंतर, संबंधित वडिलांकडूनच चुकून चूक झ्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


 

 

Web Title: America Husband angry on wife put daughter in washing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.