America President Joe Biden: जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये घुसले विमान, प्रकरणाची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 11:14 AM2022-06-05T11:14:54+5:302022-06-05T11:15:58+5:30

America President Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या घरावरुन एक खासगी विमान गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्षांच्या घराचा परिसर नो फ्लाय झोनमध्ये येतो.

America | Joe Biden | America president Joe Biden security breach, private plane came in no fly zone | America President Joe Biden: जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये घुसले विमान, प्रकरणाची चौकशी सुरू

America President Joe Biden: जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये घुसले विमान, प्रकरणाची चौकशी सुरू

googlenewsNext

America President Joe Biden: जगातील सर्वात बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी बिडेन यांच्या डेलावेअरमधील घरावर एका छोट्या खाजगी विमानाने उड्डाण घेतल्याची घटना घडली. महत्वाचे म्हणजे, बायडेन यांच्या घराचा परिसर 'नो फ्लाय झोन' आहे.

बिडेन दाम्पत्य सुरक्षित
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने या घटनेबाबत माहिती दिली. घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन सुट्टीसाठी या घरी आले होते. सध्या दोघेही सुरक्षित असून, कोणतीची चुकीची घटना घडलेली नाही. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांना एका सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. 

चुकून नो फ्लाय झोनमध्ये विमान आले
राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत गुप्तहेर विभागाने सांगितले की, हे खासगी विमान चुकून सुरक्षित क्षेत्रात घुसले. विमान या क्षेत्रात घुसल्यानंतर तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आले. या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असून, सर्वकाही ठिक असल्याची माहिती व्हाईट हाउसच्या अधिकाऱ्याने दिली.

पायलटची चौकशी होणार
सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुलिमी यांनी या घटनेबद्दल सांगितले की, विमानाचा पायलट त्याच्यासाठी सेट केलेल्या रेडिओ चॅनेलवर नव्हता. वैमानिकाने उड्डाण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे, युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस या पायलटची चौकशी करणार आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन अमेरिकन राष्ट्रपतींच्या हवाई सुरक्षेची जबाबदारी हाताळते.
 

Web Title: America | Joe Biden | America president Joe Biden security breach, private plane came in no fly zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.