सेलिब्रिटीची कोट्यावधी रूपयांची कार घेऊन 'फरार' झाला पार्किंग कर्मचारी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:30 PM2022-05-24T13:30:53+5:302022-05-24T13:31:27+5:30

America : ही घटना अमेरिकेतील आहे. पार्किंग कर्मचारी जी कार घेऊन फरार झाला ती कार प्रसिद्ध सेलिब्रिटी फिजिशिअन मिखाइल वर्षावस्कीची होती.

America : Lamborghini car stolen from parking came back after 5 hours | सेलिब्रिटीची कोट्यावधी रूपयांची कार घेऊन 'फरार' झाला पार्किंग कर्मचारी आणि मग....

सेलिब्रिटीची कोट्यावधी रूपयांची कार घेऊन 'फरार' झाला पार्किंग कर्मचारी आणि मग....

Next

America :  जगभरातील कानाकोपऱ्यात सतत काहीना काही विचित्र घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. पार्किंग स्लॉटमधील एक पार्किंग कर्मचारी पार्किंगमधील उभी कोट्यावधी रूपयांची कार घेऊन फिरायला गेला. कार मालकाची परवानगी न घेताच त्याने हा प्रकार केला. साधारण ५ तास कारने फिरल्यानंतर त्याने कार पुन्हा त्याच ठिकाणी पार्क केली.

ही घटना अमेरिकेतील आहे. पार्किंग कर्मचारी जी कार घेऊन फरार झाला ती कार प्रसिद्ध सेलिब्रिटी फिजिशिअन मिखाइल वर्षावस्कीची होती. मिखाइलला जगातील सर्वात सेक्सी डॉक्टरा किताब मिळाला आहे. मिखाइलने सांगितलं की, त्याची लॅम्बॉर्गिनी कार घेऊन पार्किंग कर्मचारी फरार झाला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही पोलीस केस केली गेली नाही.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, मिखाइलच्या कारची किंमत २ कोटी ४८ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. ही कार डॉक्टर मिखाइलने हडसन याडर्स बिल्डींग बाहेर उभी केली होती. ज्यानंतर तो रात्री त्याच्या घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी बिल्डींग सिक्युरिटी गार्डने बघितलं की, पार्किंग कर्मचारी कार रात्री उशीरा नेत आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यात तो महागडी कार पार्किंगमधून नेताना दिसत आहे.

कारच्या कथित चोरीबाबत तेव्हा समजलं जेव्हा लोक सकाळी आपली कार घेण्यासाठी आले. पण पार्किग कर्मचारी आपल्या जागी नव्हता. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलं. काही तासांनी तो परतला. तेव्हा याची माहिती डॉक्टर माइकला देण्यात आली. ही घटना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सांगितली जात आहे. 

न्यूयॉर्क सिटी पोलीस डिपार्टमेंटने यानंतर लायसन्स प्लेट चेक केली, ज्यानंतर समजलं की, ही कार पूर्ण न्यूयॉर्क शहरात फिरत होती. पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

डॉक्टर मिखाइल वर्षावस्कीला पीपल मॅगझिनने Sexiest Doctor Alive of 2015 हा दर्जा दिला होता. त्याला इन्स्टाग्रामवर ४४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तेच यूट्यूबवर त्याचे ९४ लाखांपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आहेत.
 

Web Title: America : Lamborghini car stolen from parking came back after 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.