Corona vaccine : अमेरिकेत कोरोना लस घेण्यास फ्रंटलाईन वर्कर्सचा मोठा विरोध, असं आहे कारण
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 4, 2021 05:42 PM2021-01-04T17:42:02+5:302021-01-04T17:43:39+5:30
अमेरिकेत आश्चर्यचकित करणारे आकडे समोर येत आहेत. येथे हेल्थ आणि फ्रंट लाईन वर्कर्स लस घेण्यास मोठ्या संख्येने विरोध करत आहेत.
वॉशिंग्टन - ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने रविवारी सीरम इंस्टिट्यूटच्या कोविशील्ड (Covishield) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला (Covaxin) आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारत सरकारने म्हटले आहे, की ही लस सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जाईल. मात्र, अमेरिकेत आश्चर्यचकित करणारे आकडे समोर येत आहेत. येथे हेल्थ आणि फ्रंट लाईन वर्कर्स लस घेण्यास मोठ्या संख्येने विरोध करत आहेत.
29 टक्के हेल्थ वर्कर्सचा लस घेण्यास विरोध -
कैसर फॅमिली फाउंडेशनने (Kaiser Family Foundation) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले, की 29 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना (Healthcare Workers) लस घेण्यास संकोच वाटत होता. या सर्वेक्षणात असेही समोर आले, की आरोग्य कर्मचारी कोरोना लशीमुळे होणाऱ्या साईड इफेक्टमुळेही चिंतित होते. एढेच नाही, तर लस सुरक्षित असल्यासंदर्भात सरकार वारंवार करत असलेल्या दाव्यांवरही त्यांना विश्वास नव्हता.
कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांना अधिक भीती -
'द लॅन्सेट ऑन द समर' ने प्रसिद्ध केलेल्या एका अध्ययनात दिसून आले आहे, की कोरोना लशीसंदर्भात कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांत अधिक भीती होती. तसेच या सर्वेत सहभागी झालेल्या केवळ 43 टक्केच कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांनी आपण निश्चितपणे ही लस घेणार, असे सांगितले आहे.
आश्चर्यचकित करणारे आहेत आकडे -
या आठवड्याच्या सुरुवातीलाच, ओहियोचे गव्हर्नर माईक डेव्हिन (Mike DeWine) यांनी म्हटले होते, की ते अत्यंत चिंतित आहेत, कारण ज्या नर्सिंग स्टाफला लशीसाठी निवडण्यात आले होते, त्यांपैकी लस घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. ते म्हणाले होते, साधारणपणे 60 टक्के नर्सिंग स्टाफने लस घेण्यास नकार दिला. याचबरोब फायरफायटर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी दावा केला, की न्युयॉर्कच्या अग्निशमन विभागाच्या 55 टक्के कर्मचाऱ्यांनी, त्यांना लस घेण्याची इच्छा नाही, असे म्हटले आहे.