America Laser Weapon Testing: डोळ्याचे पाते लवते न लवते तोच...! अरबी समुद्रात अमेरिकेकडून अदृष्य शस्त्राची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 10:02 PM2021-12-15T22:02:39+5:302021-12-15T22:02:56+5:30

America Laser Weapon Testing near India: विमान, युद्धनौका उद्ध्वस्त करणार. अदनच्या खाडीमध्ये या शस्त्राची चाचणी घेणे हे रणनितीच्या दृष्टीने अर्थ काढले जात आहेत. 

America Laser Weapon Testing: US invisible weapons test in Arabian Sea, China in trouble | America Laser Weapon Testing: डोळ्याचे पाते लवते न लवते तोच...! अरबी समुद्रात अमेरिकेकडून अदृष्य शस्त्राची चाचणी

America Laser Weapon Testing: डोळ्याचे पाते लवते न लवते तोच...! अरबी समुद्रात अमेरिकेकडून अदृष्य शस्त्राची चाचणी

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नौदलाने अरबी समुद्राजवळ तळ ठोकला आहे. येथील अदन खाडीमध्ये अमेरिका एका अदृश्य शस्त्राची चाचणी करत आहे. हे शस्त्र एवढे खतरनाक आहे की, मिसाईल, जहाजे, ड्रोन आणि लढाऊ विमाने डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर उद्ध्वस्त करू शकणार आहे. या आधीही अशा शस्त्राचे यशस्वी परीक्षण केल्याचे अमेरिकेच्या सैन्याने म्हटले आहे.


अमेरिकी नौदलाच्या नेव्हल फोर्सेस सेंट्रल कमांडने याची घोषणा केली आहे. अनेक नवीन उच्च ऊर्जा क्षमतेच्या लेझर शस्त्रास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. अदनच्या खाडीमध्ये या शस्त्राची चाचणी घेणे हे रणनितीच्या दृष्टीने अर्थ काढले जात आहेत. 

अमेरिकेच्या नौदलाने सांगितले की, एम्फीबियस ट्रांसपोर्ट डॉक शिप यूएसएस पोर्टलँड (एलपीडी 27) ने अदन खाडीमध्ये तैनातीवेळी डिसेंबरला एका उच्च क्षमतेच्या लेझर शस्त्राचे परीक्षण केले. यावेळी पोर्टलँडवर असलेल्या सॉलिड स्टेट लेजर- टेक्नोलॉजी म्यूटेशन लेजर वेपन सिस्टम डेमोस्ट्रेटर (LWSD) मार्क-2 ने स्थिर लक्ष्य टार्गेट केले. 

 2018 पासून या पोर्टलँडवर लेझर हत्यारे आहेत. या शस्त्रांची चाचणी घेतली जाते. पोर्टलँड हे अमेरिकी नौदलाच्या एसेक्स एम्फीबियस रेडी ग्रुपचा एत भाग आहे. या ग्रुपमध्ये जगातील सर्वात खतरनाक जहाजे मानली जाणारी एम्फीबियस असॉल्ट शिप यूएसएस एसेक्स (एलएचडी 2), डॉक लँडिंग जहाज यूएसएस पर्ल हार्बर (एलएसडी 52) ही सहभागी आहेत. सध्या या युद्धनौका चीन आणि रशियावर जरब ठेवण्यासाठी अदन खाडी ते फारस खाडीपर्यंत गस्त घालतात. 
 

Web Title: America Laser Weapon Testing: US invisible weapons test in Arabian Sea, China in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.