आता वाढलं ड्रॅनगनचं टेन्शन!; अमेरिका चीनविरोधात घेऊ शकतो 'सर्वात मोठी' अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:43 AM2020-07-24T11:43:09+5:302020-07-24T11:49:27+5:30
सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनांशिअल टेलिकम्युनिकेशन (SWIFT) एक नेटवर्क आहे. याचा वापर जगभरातील बँकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी केला जातो.
वॉशिग्टन - कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. संबंध बिघडल्यापासून अमेरिकाचीनला सातत्याने धक्के देत आहे. आता ट्रम्प सरकार चीनला यूएस डॉलर सिस्टममधून (SWIFT) बाहेर काढण्याची अथवा त्याचा अॅक्सेस कमी करण्याची शक्यता आहे. चिनी वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका वृत्तानुसार, अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बिजिंगची चिंता वाढली आहे.
सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनांशिअल टेलिकम्युनिकेशन (SWIFT) एक नेटवर्क आहे. याचा वापर जगभरातील बँकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी केला जातो. ज्या पायाभूत सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीत अमेरिन डॉलरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, अशा पायाभूत सुविधांचा हा भाग आहे.
वैश्विक दृष्ट्या बँकांचे अमेरिकन बँकांशी संबंध आहेत. याच माध्यमातून त्या अमेरिकन डॉलरचे ट्रांजेक्शन करतात. याच पेमेन्ट सिस्टिमच्या माध्यमाने व्हाईट हाऊस अमेरिकन बँकांना एखादी व्यक्ती, संस्था अथवा देशाशी व्यवहार थांबवण्याचा आदेश देऊ शकते. तसेच, शिनजियांग आणि हाँगकाँग मुद्यावरून संपूर्ण जगाचा विरोध होत असल्याने चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष चिंतेत आहे.
सीसीपीच्या काही समर्थकांनी म्हटले आहे, की अमेरिका चीनविरोधात अशाप्रकारचे कठोर पाऊल उचलणार नाही. अमेरिकेने ईरान आणि नॉर्थ कोरियाविरोधात असे पाऊल उचलले आहे. चीन बरोबरही असे केले गेले तर, अमेरिका आणि वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी धोका अधिक वाढेल. तर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की चीनची भीती अगदी योग्य आहे. कारण संबंध असेच बिघडत राहिले, तर अमेरिका बिजिंगवर हल्ल्यासाठी डॉलर आधिपत्याचाही वापर करू शकते.
अमेरिकेने काही चिनी अधिकारी आणि संस्थांवर बंदी घातली आहे. नुकतेच अमेरिकन परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हुआवेईसह काही टेक्नॉलजी कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी घालण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेने चीनला ह्युस्टन येथील चिनी दूतावास बंद करण्याचा आदेश दिला आहे. अशी परिस्थिती असताना चीनला भीती वाटने स्वाभावीक आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर