'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 10:09 AM2021-07-14T10:09:51+5:302021-07-14T10:13:31+5:30

नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे.

America Nasa internship girl trolled goddess laxmi saraswati idols near laptop | 'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

Next

 
नासा, ही एक अमेरिकेती टॉपची स्पेस एजन्सी आहे. त्यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोने विज्ञान आणि धर्म यांच्यातील चर्चेला पुन्हा जिवंत केले आहे. या फोटोत भारतीय-अमेरिकन वंशाची एक मुलगी दिसते, ती सायन्सची विद्यार्थिनी आहे. याच बरोबर ती देवावर विश्वास ठेवत असल्याने निशाण्यावर आली आहे. येथे महत्वाची गोष्ट म्हणजे, ट्विटरवर मोठ्या संख्येने लोक तिच्या समर्थनार्थदेखील उभे राहिले आहेत.

नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. यांत एक फोटो भारतीय-अमेरिकन वंशाच्या एका मुलीचाही होता. यात तिच्या मागच्या बाजूला लॅपटॉप सोबत देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांच्या बऱ्याच मूर्ती आणि फोटो ठेवले होते. याच पार्श्वभूमीवर ती मुलगी आणि नासा सोशल मिडियावर युझर्सच्या निशाण्यावर आहेत.

यावर सोशल मिडिया युझर्सनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की असे करून नासा सायन्सची खिल्ली उडवत आहे. मात्र, या इंटर्नला मोठ्या संख्येने लोकांनी समर्थनही दिले आहे. यात अनेक युझर्सनी म्हटले आहे, की धर्माच्या नावावर कुणावर निशाणा साधणे योग्य नाही. तर काही लोक म्हणाले, की कुणाच्या आस्थेची अशा पद्धतीने खिल्ली उडवणे चुकीचे आहे.

एका युझरने लिहिले आहे, की 'मी हिंदू आहे. मी देव मानत नाही, पण आपला धर्म आणि त्याच्या शिकवणीचा सन्मान करतो. नेहमीच इतरांचा धर्म आणि मान्यतांचा सन्मानही करतो. मी कधीही त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांना त्यांच्या धर्मासाठी ट्रोल करणे बंद करा.'

Web Title: America Nasa internship girl trolled goddess laxmi saraswati idols near laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.