नासा सूर्य अन् सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार, ब्रह्मांडाच्या रहस्यांवरून पडदा उठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:53 AM2020-08-31T08:53:30+5:302020-08-31T08:56:31+5:30
या अभियानाच्या संकल्पनेच्या अभ्यासाच्या प्रत्येक प्रस्तावाची किंमत 1.25 दशलक्ष डॉलर्स (10 कोटी 96 लाख रुपये) असेल आणि त्यानंतर हे अभियान सुरू करण्यात येईल.
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने सूर्यावरील आणि त्याच्या सभोवतालच्या अभ्यासासाठी (ज्याद्वारे ते पृथ्वीशी संपर्क कायम ठेवू शकतात) विस्तृत तपशीलवार ब्लू प्रिंट तयार केली आहेत. मिशन म्हणून नासा हा उपक्रम राबवणार आहे. यासाठी एजन्सीने पाच प्रस्ताव ठेवले आहेत. अमेरिकेच्या अंतराळ एजन्सीने सांगितले की, या अभियानाच्या संकल्पनेच्या अभ्यासाच्या प्रत्येक प्रस्तावाची किंमत 1.25 दशलक्ष डॉलर्स (10 कोटी 96 लाख रुपये) असेल आणि त्यानंतर हे अभियान सुरू करण्यात येईल.
नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, या मोहिमेमुळे अंतराळाविषयीच्या आपल्या माहितीत सुधारणा होईल. त्याचवेळी अंतराळात जाणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांसारख्या शक्ती अंतराळवीर तसेच उपग्रहांना वाचवू शकतात आणि जीपीएस यांसारख्या संप्रेषण सिग्नलमध्ये आणखी सुधारणा करता येईल.
वॉशिंग्टनमधील नासाच्या विज्ञान मिशन संचालनालयाचे सहयोगी प्रशासक थॉमस झुरबुचेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही एक मिशन शोधत होतो, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.” आता आपले स्वप्न साकार होणार आहे. ते म्हणाले, 'आम्ही आशा करतो की, नवीन मिशनला असे काहीतरी पाहण्याची संधी मिळेल जे आपण यापूर्वी कधीही पाहिले नाही. तसेच संशोधनाच्या क्षेत्रात बरीच महत्त्वाची माहिती सापडेल आणि विश्वाची रहस्येही समोर येतील.
नासाच्या विज्ञान मिशन संचालनालयाच्या हेलिओफिजिक्स विभागाच्या संचालिका निक्की फॉक्स म्हणाल्या, 'अंतराळवीरांना प्रवास करता येईल आणि त्यांचे उद्दिष्ट साध्य करता येईल, यासाठी आम्ही सौर यंत्रणेत सावधगिरीचे सेन्सर्स उपलब्ध करून देतो. आम्ही नासाच्या भावी मोहिमेसाठी पूर्णपणे तयार आहोत. हेलिओफिजिक्स कार्यक्रमांतर्गत ऊर्जा, कण आणि प्रचंड चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास केला जातो. हा प्रदेश दोन ग्रहांच्या दरम्यान आहे. सूर्याच्या प्रकाशात त्याची परस्पर प्रणाली बदलते.