बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे
By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 09:08 AM2021-01-21T09:08:45+5:302021-01-21T09:13:17+5:30
बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात
कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या, कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला, अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच बायडेन यांनी कामालाही सुरूवात केली. तसंच बायडेन यांनी निवडणुकांपूर्वी दिलेला शब्दही पाळला.
बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेले काही निर्णय मागे घेतले. निवडणुकांदरम्यान बायडेन यांनी दिलेल्या आश्वासनांची आणि मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या अमेरिकेतील मागण्यांवर बायडेन यांनी स्वाक्षरी केली.
Wearing masks isn't a partisan issue — it's a patriotic act that can save countless lives. That's why I signed an executive order today issuing a mask mandate on federal property. It's time to mask up, America.
— President Biden (@POTUS) January 21, 2021
We're back in the Paris Climate Agreement.
— President Biden (@POTUS) January 21, 2021
यादरम्यान त्यांनी कोरोना महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी एक निर्णय घेतला. तसंच मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला, सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याची घोषणा, वातावरण बदलवरील ट्रम्प यांचा निर्णय मागे, वर्णभेद संपवण्याच्या दिशेनं पाऊल, जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्यावर रोख, सीमेवर भिंत उभारण्याचा निर्णय मागे घेत निधीही थांबवला, मुस्लीम देशांवर घातलेली बंदी मागे, तसंच विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थगिती, असे अनेक निर्णय़ बायडेन यांनी सूत्रं स्वीकारताच घेतले.
After taking the oath of office this afternoon, I got right to work taking action to:
— President Biden (@POTUS) January 20, 2021
- Control the pandemic
- Provide economic relief
- Tackle climate change
- Advance racial equity
डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचं बाहुले असल्याचं सांगत कोरोना काळातच त्यातू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बायडेन यांनी आपण निवडून आल्यास जागतिक आरोग्य संघटनेत परतू असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी सत्तेत येताच आपला शब्द पाळला आहे. संयुक्त राष्ट्रांकडूनही अमेरिकेच्य़ा या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.