'चीनपासून मुक्ती...', अमेरिकेच्या निवडणुकीत भारताचीच हवा? उमेदवार करतायत मोठे दावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:25 PM2023-08-28T12:25:43+5:302023-08-28T12:26:46+5:30
रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी येत आहे. त्यापूर्वीच उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यातच अमेरिकेमध्ये आतापासूनच भारताचा मुद्दा गाजायला सुरुवात झाली आहे.
अमेरिकेत येणाऱ्या वर्षात राष्ट्रपती निवडणुका होणार आहेत. याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी येत आहे. त्यापूर्वीच उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यातच अमेरिकेमध्ये आतापासूनच भारताचा मुद्दा गाजायला सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवार असेही आहेत, जे आतापासूनच आपण भारताच्या जवळचे असल्याचे दर्शवत आहेत. यांत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचाही समावेश आहे.
विवेक रामास्वामी यांनी नुकतेच एक विधान केले आहे, त्याच्या या विधानाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. अमेरिकाचीनच्या मैत्रीत अडकला आहे, मात्र आम्ही सत्तेवर आलो, तर भारतासोबतची मैत्री अधिक चांगली करून. म्हणजे, अमेरिकेला चीनपासून मुक्ती मिळेल. विवेक रामास्वामी यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कार चीन आणि अमेरिकेदरम्यान आर्थिक भागिदारी असूनही तनावाचे वातावरण आहे.
38 वर्षीय विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे की, आपली भारतासोबतची मैत्री चीनपासून आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्ग प्रशस्त करेल. आज अमेरिका पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. मात्र, आपल्याला यातून बाहेर पडावे लागेल. आशिया खंडात भारत हा एक असा देश आहे. ज्याच्यासोबतची मैत्री आपल्याला चीन पासून मुक्ती देऊ शकते. एवढेच नाही, तर आपल्ला नेतृत्व मिळाल्यास आपण या मार्गाने मार्गक्रमण करू, अशेही त्यांनी म्हटले आहे.
भारताचे उमेदवार आणि भारतासोबत मैत्री -
अमेरिकेची निवडणूक पूर्णपणे भारतीय रंगाने रंगताना दिसत आहे. एकट्या रिपब्लिकन पक्षाकडूनच तीन उमेदवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत. विवेक रामास्वामींशिवाय निकी हेली, हर्षवर्धनही या शर्यतीत आहेत. या तिघांनीही रिपब्लिकन पक्षाच्या पहिल्या डिबेटमध्ये भाग घेतला होता. तसेच आपला अजेंडा जनतेसमोर ठेवला होता. विवेक रामास्वामी तर उघड उघड भारासोबत मैत्री करण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. असा सूर इतरही उमेदवारांचा दिसतो. मात्र काही मुद्द्यांवर निकी हेली अथवा इतर उमेदवारांनी भारतावर टीकाही केली. अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक 2024 मध्ये होत आहे.